आजची ही तारीख शतदा यावी, ईश्वरचरणी आता हीच मागणी, सुख शांतीने समृद्ध व्हावा, सुखाचा ठेवा मनोमनी साठवावा...लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले संसार, लग्न आणि नव्या जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला....तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
नाती ही जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांचे प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली...तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
घागारीपासून सागरापर्यंत, प्रेमापासून विश्वासापर्यंत, दुःख पासून सुखापर्यंत, आयुष्यभर राहो आपली जोडी कायम...!Happy Wedding Anniversary!
एकमेकांसाठी समर्पनच दुसर नाव आहे तुमचं हे नात, विश्वासाची नवी गाथा आहे तुमचं नात, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नात, तुमच्या दोघांच्या या गोड नात्यास आमच्या कडून गोड-गोड शुभेच्छा...!
एकमेकांच्या डोळ्यातले स्वप्नं अशीच नेहमी पुर्ण करत रहा. प्रेम आणि विश्वासाने संसार फुलवत रहा. तुमच्या जोडीला आमचा सलाम आणि शुभेच्छा!
आजच्या दिवशी तुमचं प्रेम पुन्हा नव्यानं उमलू दे. संकटं आली तरी हातात हात घालून लढण्याची प्रभू यांना हिम्मत दे. प्रेमाने भरलेला हा प्रवास असंच निरंतर अजून सुंदर व्हावा हीच शुभेच्छा!
तुमच्या एकत्रित वाटचालीला सतत मिळो आशीर्वादांचा वर्षाव. प्रत्येक दिवस असो एकमेकांसाठी खास. लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
तुमच्या जोडीस भेटत राहो नेहमी सुख, शांती आणि प्रेमाची साथ. प्रत्येक वर्ष प्रेमाच्या नव नवीन कारणांनी उजळू दे, तुमचं आयुष्य नेहमी फुला सारख बहरू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
संसारात कितीही चढ-उतार आले तरी, प्रेमाची आणि एकमेकांच्या बद्दल विश्वासाची वीण घट्ट ठेवावी. तुमचं नातं हे त्याचं सर्वात सुंदर उत्तम उदाहरण आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!