हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षातील महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे “मकर संक्रांती”(sankranti ukhane marathi | मकर संक्रांती उखाणे) आपण जर संक्रांती मराठी उखाणे शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. मकर संक्रांतीचे सामाजिक, भौगोलिक दृष्ट्या खूप महत्व आहे. भारतातील इतर अनेक राज्यांमध्येही हा सण वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या रुपामध्ये साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये या सणाचे जास्त महत्व जरी असले तरी प्रामुख्याने महिलांसाठी ह्याचे एक वेगळेच आकर्षण असते. संपूर्ण महिला ह्या सणासाठी नवीन वस्त्र, अलंकार (बांगड्या, हलव्याचे दागिने, साड्या इतर समान) आवर्जून खरेदी करतात. त्यांच्याशीच निगडीत एक परंपरा म्हणजे महिलांचे एकमेकांच्या घरी जाऊन होणारे “हळदी-कुंकू”. त्या मध्ये होणारे “नाव/उखाणे” घेण्याची प्रथा. त्यामुळे ह्या POST मध्ये आम्ही युवा पिढीतील लोकांसाठी साजेसे मजेदार उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय. त्यामुळे ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला sankranti ukhane marathi | मकर संक्रांती उखाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये मकर संक्रांती उखाणे__ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आजच नाही नेहमीच गोड तुम्ही बोला, मोठ्यांशीही गोड , लहान्यांशीही गोड, कोणीही असो मग लहान थोर, कधीच मोडायचे नाही कोणाचेच मन, मनात शिरून मिळते धन, आमचे असले विचार आहेत थोर, माझ्याशी लग्न केलं ना म्हणून आमचे ____ राव आहेत कित्ती कित्ती हो हुशार….!!!
काळ्या साडीला जरीचा पदर, हलव्याचे दागिने, सोबतीला सुगड पूजन, हळदी कुंकवाचा घातला घाट, _____ राव माझे की प्राण….!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये मकर संक्रांती उखाणे__ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
makar sankranti ukhane | मकर संक्रांती उखाणे
आपण जर नवीन (sankranti ukhane marathi | मकर संक्रांती उखाणे) शोधत असाल तर आपण योग्य Website वर आलेला आहात. आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये संक्रांतीच्या काळामध्ये उखाणे घेण्याची फार जुनी परंपरा आहे. बऱ्याचदा असेही आढळून आले आहे की, या दिवशी काही ठिकाणी छोटे-मोठे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात जिथे सर्व महिला एकत्र येऊन आपल्या पतीसाठीचा उखाणा घेतात व “वाण” स्वरूपी भेटवस्तू एकमेकींना देतात.
चला तर खास (sankranti ukhane marathi | मकर संक्रांती उखाणे ) उखाणे बघुयात.
संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान, संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान, ____ रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाच वाण.
तिळगुळाच्या च्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ठ मेळ, तिळगुळाच्या च्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ठ मेळ, ____ रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ!
चढता लाली ओठी करिते मी मधुर हास्य, चढता लाली ओठी करिते मी मधुर हास्य, ____रावांच्या आनंदातच आहे मला स्वारस्य!
रत्नजडीत हार अन कंठा वाढविती माझ्या गळ्याची शोभा, रत्नजडीत हार अन कंठा वाढविती माझ्या गळ्याची शोभा, ___ रावांच्या यशोतेजाने उजळून निघाला माझ्या मनाचा गाभा…!
नेसली मी काळी चंद्रकला त्यावर शोभे मोत्यांचा कमरबंद, नेसली मी काळी चंद्रकला त्यावर शोभे मोत्यांचा कमरबंद, ____ रावा सोबत पर्यटन करणे हा आहे माझा आवडता छंद…!
घुंगरांची नाजूक किणकिण निर्मिती माझ्या पायींचे पैंजण, घुंगरांची नाजूक किणकिण निर्मिती माझ्या पायींचे पैंजण, माझ्या आणि ____ रावांच्या प्रितफुलाने धून झाले माझ्या मनाचे अंगण…!
चांदीची शुभ्रधवल जोडावी अन बिरुध्या वाढविती सुवासिनीच्या चरणांच्या मान, चांदीची शुभ्रधवल जोडावी अन बिरुध्या वाढविती सुवासिनीच्या चरणांच्या मान, ____राव सोबत असता समस्यांचे पर्वत मला भासती लहान…!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये मकर संक्रांती उखाणे__ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, ___ चं नाव घेते पहिला नंबर माझा!
मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, ___ साठी मागितले दीर्घायुष्याचे दान!
काकवी पासून बनवतात गुळ, काकवी पासून बनवतात गुळ, ___ रावांच नाव घेऊन वाटते तिळगुळ…!
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!
मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, _____रावांच्या पत्नीचे पद अभिमानाने मिरविते..!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये मकर संक्रांती उखाणे__ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सण, वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करत राहू.
नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, ____रावांच्या सहवासात जीवन झाले सुखमय…!
संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, _____रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा…!
कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, _____रावांच नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात…!
नाव घ्या, नाव घ्या म्हणून आता कटू नका गजर, नाव घ्या, नाव घ्या म्हणून आता कटू नका गजर, ___रावांच नाव घ्यायला मी नेहमी हजर…!
चंद्राचा उदय, समुद्राला भरती, चंद्राचा उदय, समुद्राला भरती, ___रावांच्या प्रेमळ शब्दांनी माझे सर्व श्रम हरती…!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये मकर संक्रांती उखाणे__ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
लावत होते कुंकू, त्यात पडला मोती, लावत होते कुंकू, त्यात पडला मोती, ____राव माझे पती, सांगा भाग्य माणू किती?
उखाणा घेऊन भागीनिंच्या साप्तगुनांना मिळतो वाव, उखाणा घेऊन भागीनिंच्या साप्तगुनांना मिळतो वाव, आज आहे संक्रांत _____रावांचे घेते मी नाव.
अश्याच Unique उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Special Content पुरविण्याचा प्रयत्न करू.