आपण जर Funny ukhane/चावट (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे)मराठी उखाणे शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. ह्या POST मध्ये आम्ही युवा पिढीतील लोकांसाठी साजेसे मजेदार/Funny उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय. आम्ही येथे आवर्जून नमूद करू इच्छितो की खालील दिलेली उखाणे आपण व्यवस्तित वाचून आणि संपूर्ण अर्थ समजून जास्तीत जास्त आपल्या समवयस्क व्यक्ती समोर घ्यावेत जेणेकरून कोणालाही हिनाविल्यासारखे वाटणार नाही. तसेच ज्या व्यक्तींची विनोद बुद्धी आणि समजूतदार पणा शाबूत आहे त्यांच्या समोरच हे उखाणे/नाव घ्यावीत, जेणेकरून वादविवादाचे प्रसंग टाळता येतील. बदलत्या काळानुसार उखाण्यांची शब्द रचनाही बदलत चालली आहे आणि ती बदलायलाच हवी. कारण उखाणे म्हणेज शेवटी चालू काळाला अनुसरून केलेली एक शब्द रचनाच असते. ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला मराठी उखाणे उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण ते स्वतः जरूर वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या समारंभातील आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने नक्की जिंकावीत.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
_____ (शहराचे नाव) मध्ये बंगला उभा आहे ऐटीत, _____ (शहराचे नाव) मध्ये बंगला उभा आहे ऐटीत, जळू नका तुम्ही लोकहो आमचे ___ राव आहेत आय.टी त.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन, गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ____ आहे माझी ब्युटी क्वीन.
_____चा नि माझा संसार होईल सुखकर, _____चा नि माझा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चिरेण भजी आणि तो लावेल कुकर.
कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी, कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी, ____ माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.
A B C वन टू थ्री, A B C वन टू थ्री, ____ चं नाव घेते मला करा फ्री.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
आपण जर नवीन चावट मराठी उखाणे शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात.आपल्या सर्वांना कल्पना असेलच की नवरा-बायकोचं नात हे जगातील सर्वात वेगळा असा नात असत. कारण ते दोघे एकमेकांचे मित्रही असतात, आदर हि असतो आणि कधी कधी हसत खेळत रागही असतो म्हणूनच एकमेकांना चिडवून मजा घेणे हे काही त्यांच्यासाठी नवीन नसते उलट ओळखींच्या मध्ये असं करण्यासाठी प्रोत्साहन भेटते. चला तर खास उखाणे बघुयात.
मोबाईल वर एफ एम एकते कानात हेडफोन टाकून, मोबाईल वर एफ एम एकते कानात हेडफोन टाकून, आणि ____ रावांना मिस call देते एक रुपया balance राखून.
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, ____ चं नाव घ्यायला मला नाही आळस.
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, ____ चे नाव घ्यायला अडलंय माझ खेटर.
सचिनच्या bat ला करते नमस्कार वाकून, सचिनच्या bat ला करते नमस्कार वाकून, _____ रावांच नाव घेते पाच गडी राखून.
इराणी च्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, इराणी च्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, _____ रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.
_____रावांची थोरवी मी सांगत नाही, _____रावांची थोरवी मी सांगत नाही, कीतीही “प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत!!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
ह्या POST आम्ही मुख्यत्वे नव्या दमाच्या तरुणाई साठी च्या मजेदार उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. उखाणा जर चावट किवां मजेदार वर अनुसरून असेल तर एक तर तो जुना म्हणजेच नेहमी घेतला जाणारा आणि कंटाळवाणा वाटत नाही.
Chavat Ukhane in Marathi | चावट मराठी उखाणे
बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या, बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या, ____ रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.
लाडाने जवळ गेले, केली जरा घसट, लाडाने जवळ गेले, केली जरा घसट, ____ राव एकदम खेकसले, फारच बाई तिरसट.
आजघर माजघर माजघराला नाही दार, आजघर माजघर माजघराला नाही दार, ____ रावांच्या घरात मात्र खिडक्या २ हजार.
रेशीमच्या सदऱ्याला प्लास्टिक चे बक्कल, रेशीमच्या सदऱ्याला प्लास्टिक चे बक्कल, _____ रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.
___ पुढे मांडले जेवणाचे ताट, ___ पुढे मांडले जेवणाचे ताट, ___ मुळे लागली माझ्या जीवनाची वाट!
तळ्यातल्या चिखलात लाल कमळ उमलले, तळ्यातल्या चिखलात लाल कमळ उमलले, गणपतराव खड्डात पडले, त्यांना दुसऱ्याने काढले.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
Chavat Ukhane | चावट उखाणे
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, गणपतराव दिसतात साधे, पण आतून इकदम चालू.
कालच पिक्चर पहिला नाव त्याचे सायको, कालच पिक्चर पहिला नाव त्याचे सायको, फाल्गुंरावांच नाव घेते _____ रावांची बायको.
अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका, अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका, नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका.
पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जनी, पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जनी, सोडल्या तिघीजणी नी झालो ____चा धनी
इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वोअतर, इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वोअतर, ___ रावांच नाव घेते मी त्यांची होम मिनिस्टर.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
Chavat Ukhane in Marathi | चावट मराठी उखाणे
बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू, बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू, ___ राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू!
लग्न झालं की नाव घेण हा जणू कायदा, लग्न झालं की नाव घेण हा जणू कायदा, ____ तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
फिरायला जायला तयार होते मी झटकन, फिरायला जायला तयार होते मी झटकन, अन ____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये __ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi | चावट मराठी उखाणे) पूर्ण करायचा आहे.
Chavat Ukhane in Marathi | चावट मराठी उखाणे
रेशमी सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल, रेशमी सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल, ____ राव एवढे handsome पण डोक्यावर मात्र टक्कल!
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, ___ नसलीस की Online मला नाही करमत!
एक होती चिऊ आणि एक होती काऊ, एक होती चिऊ आणि एक होती काऊ, ____च नाव घेतो डोक नका खाऊ!
नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपूर चुका, नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपूर चुका, ____चे नाव घेतो द्या सगळ्याजणी एक एक मुका!
राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, अन ___ रावांचे नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा..!
केसर दुधात टाकले काजू, बदाम, जायफळ, केसर दुधात टाकले काजू, बदाम, जायफळ, ____चं नाव घेतो वेळ न घालवता वायफळ!
अश्याच Latest आणि Funny उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Funny Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू.