family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स

आपण जर (family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहत. आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा म्हणजे आपली कुटुंब पद्धती. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि समाज म्हटल की, वेग-वेगळे व्यक्ती हे आलेच व वव्यक्ती आले म्हणजे त्यांचे कुटुंबही आलेच. प्रत्येक व्यक्तीची खरी शक्ती म्हणजे त्याचे कुटुंब. कारण आपण सर्वांना माहितीच असेल की, जीवनात चढ-उतार हे येताच असतात, तेव्हा आपल म्हणून कोणी असण आणि तेही हक्काचं. तेव्हा आपण संकटांना तोंड देतांना एकाकी पडत नाही व आनंद साजरा करताना कुटुंबामुळे आनंद द्विगुणीतच होतो.

म्हणूनच Visualमराठी आपल्या सर्वांसाठी कुटुंबाप्रतीच्या भावना व्यक्त करण्यासाठीचे नवीन विचार/कोट्स (family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) चा संग्रह घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत नक्की Share करा. आपल्या मनातल्या भावना आम्ही शब्द रुपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेकवेळा कुटुंबातील व्यक्तींच्या वेग-वेगळ्या स्वभावामुळे अनेक समाज-गैरसमज होतात त्याला अनुसरून आम्ही अनेक विचार/कोट्स खाली उपलब्ध करून दिलेले आहेत आपण ते नक्की वाचा आणि share करा, धन्यवाद!

मोकळीक कितीही मिळाली तरी,

मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावाच लागतो…!

शरीरात सौंदर्य नसते,

सुंदर असते त्या व्यक्तीची कृती,

त्याचे विचार, त्याचे बोलणे,

त्याचे वागणे, त्याची संस्कृती आणि त्याचे चारित्र्य…!

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका,

पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका…!!!

प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे,

कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण येड्यासारख नाती निभवत असतो…!

टीप(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल

तर लक्षात ठेवा वेळेचा फेरा फिरला की तुम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ शकता…!

|| आयुष्याच गणित ||

आयुष्याचे गणित जरा चुकल्यासारखे वाटत आहे,

सगळेच आपले आहे तरीसुद्धा सगळे परक्यासारखे वाटत आहे,

माणसांचा पूर वाहत असतांनाही त्या गर्दीत एकट एकट वाटत आहे,

नाती गोती मित्र प्रेम सगळंच सुटल्यासारख वाटत आहे.

एक मोठ कुटुंब सुखी असत..!

पण एक चुकीची व्यक्ती लग्न करुन घरात येते तेव्हा घराचे तुकडे होतात…!

घर फोडणारे आपलेच असतात

बाहेरच्यांना काय माहिती कोणती भिंत नाजूक आहे…!

family quotes in marathi
family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स
” नाती “
 
फक्त रक्ताची असतात असं नाही, नात्यातं सगळ्यात महत्त्वाची असते.
 
“जाणीव”
 
असेल तर परकी माणसंही आपले होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकं व्हायला वेळ लागत नाही…
 

family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स

टीप(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

जुनी लोकं भावनिक होती…

तेव्हा नाती जपत होती….

नंतर लोकं प्रक्टिकल झाली…

नात्याचा फायदा उचलू लागली.

आता लोकं प्रोफेशनल झाली….

फायदा असेल तरच नाती बनवू लागली…!

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे

आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,

चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे…!

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,

कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!

नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही…

ज्यांच्याकडे खूप आहे, त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून रहा माणसा, कारण…

आयुष्य पुन्हा मिळत नाही…!

टीप(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
family quotes in marathi
family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स

पंखात बळ आलं की,

प्रत्येक पाखरान घरटं जरूर सोडावं, आणि आभाळात उंच उडावं..

पण त्या घरट्याला कधी विसरू नये

ज्याने मायेची उब, सावली, प्रेम व आधार देऊन वाढवलेलं असतं.

नाती बिघडण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे

लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त..!

कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही

अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणुक आणि संस्कार हे सुद्धा कमाई मध्येच “मोजले” जातात…

आयुष्याचा मार्ग निवडताना,

आई-वडिलांच मत नक्की घ्या..

कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो..!!

चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका,

फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका.

जिथं चूक नाही तिथे झुकू नका अन

जिथे सन्मान नाही तिथे अजिबात थांबू नका..!

चार लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नाही

कारण त्या चार लोकांमध्ये तीन तर आपल्या जवळचे असतात.!!

टीप(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
family quotes in marathi
family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स

आई घराचं मांगल्य असते,

तर बाप घराचं अस्तित्व !

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी
 
अंधारात “सावली” म्हातारपणात “शरीर”
 
आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही.
 
साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच…

कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चूकीचे नसतात,

कारण कमीपणा घेण्यासाठी खरच मन खूप मोठच असाव लागतं.

ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात,

त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो.

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
 
याला जास्त किंमत असते..
 
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
 
या जगात नाते तर सगळेच
 
जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते..

न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ

तेव्हा उत्तरे आणि पर्याय आपल्या जवळ चालून येतात…!!

टीप(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
family quotes in marathi
family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स

लोक म्हणतात आपण चांगलं वागल की सगळ जग चांगल वागत.

पण खर सांगु, आपण जेवढ चांगल वागु ना तेवढाच लोक आपला गैरफायदा घेतात.

माणसाने जसे आहे तसेच रहाणे चांगले

ज्यांना तुम्ही आवडलात तो तुम्हाला विसरणार नाही

आणि ज्यांना तुम्ही नाही आवडलात त्यांच्यावर तुम्ही कितीही जीव ओवाळून टाकलात तरी ते तुमचे होणार नाहीत.

सगळे म्हणतात जग बदलले, जगात काय बदलले?
 
मिरचीचा तिखटपणा बदलला नाही,
 
आंब्याचा गोडवा बदलला नाही,
 
पानांचा हिरवा रंग बदलला नाही,
 
मग माणसाने माणुसकी गमावली आणि सर्व जगाला दोष दिला.

वेळ निघुन गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो,

म्हणुन वेळ आहे तोपर्यंत समजुन घेत जा,

माणुस एकदा निघून गेला की परत येत नसतो..

लक्षात ठेवा…
 
 
 
इथंच कमवायच आहे आणि इथंच गमवायचं आहे
 
 
 
त्यामुळे कोणाची मन दुखवू नका कारण माणुसकीच मोल हे पैश्यापेक्षा खुप मोठं असतं..!!

जोपर्यंत माणूस रुसतोय,

रागावतोय भांडतोय,

अपेक्षा ठेवतोय,

नको ती बडबड करतोय तोपर्यंत माणूस आपला.

ज्यादिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही गमावलं.

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली,

म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही.

साथ देतात ती आपली जवळची माणसं.

जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे

जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतात…

टीप(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स) आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
family quotes in marathi
family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,

माफी मागून ती नाती जपा,

कारण वेळ आल्यावर पैसा नाही,

तर माणसंच साथ देतात…

फक्त माणूस असणे पुरेसे नाही,

तर माणसाच्या आत माणुसकी असणेही आवश्यक असते.

दिवस लक्षात राहात नाहीत,

लक्षात राहतात त्या फक्त आठवणी !

प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं,

कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल,

म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगल असत..!

जेव्हा आपले जवळचे आपल्यापासून काही लपवायला चालू करतील

तेव्हा समजून जावा धोक्याची चाल रचली जात आहे..!!

|| सत्य ||
 
आपण ज्यांना मनापासून आपलं समजतो ना
 
तेच लोक आपल्याला पर्याय म्हणून बघतात

साखरेची गोडी सेकंदच राहते,

पण माणसाच्या स्वभावातील गोडी

मात्र, शेवटपर्यंत मनात घर करून जाते…!

समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं महत्त्वाचं ठरते
 
नेहमीच
 
माझंच खर
 
म्हणून चालत नाही

कुटुंब घड्याळ्याच्या काट्यासारखं असलं पाहिजे.

कोणी लहान,

कोणी मोठा,

कोणी स्लो,

कोणी फास्ट

पण जेव्हा कोणाचे १२ वाजणार असेल तेव्हा सगळे एकत्र पाहिजे.

“माणूस नजरेतून तेव्हाच उतरतो,

जेव्हा आपल्याला सत्य माहित असतं,

पण तरीही समोरची व्यक्ती आपल्याला तोंडावर खोटं बोलत असते..!!”

नाते मनापासून सांभाळायचे असेल,

तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,

आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

(family quotes in marathi | कुटुंबांशी निगडीत कोट्स)

अश्याच कुटुंबासंबंधित भावनिक मराठी विचार/कोट्स वाचण्यासाठी आणि आपल्या Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.

वाचाल तर वाचाल!

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपली मातृभाषा मराठी ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा व आपले विचार आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा नक्की  विचार करून गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.

मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!

कुटुंबांशी निगडीत कोट्स सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.