35+ BEST comedy marathi ukhane 2026 | मजेदार मराठी उखाणे २०२६

comedy marathi ukhane

आपण जर Funny/मजेदार मराठी उखाणे (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. मराठी संस्कृतीत उखाणे म्हणजे केवळ नाव घेण्याची परंपरा नाही, तर हास्य, प्रेम आणि हुशारीचा सुंदर संगम आहे 😄
लग्नसमारंभ, हळद, गृहप्रवेश किंवा कौटुंबिक कार्यक्रम असो—मजेदार मराठी उखाणे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.
Comedy Marathi Ukhane या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळतील नवीन ट्रेंडनुसार तयार केलेले, खळखळून हसवणारे आणि सगळ्यांच्या लक्षात राहणारे उखाणे.
नवीन वर्षात तुमच्या खास क्षणांना खास बनवण्यासाठी हे उखाणे नक्की वापरा!
Visualमराठीच्या ह्या POST मध्ये आपल्याला comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि आपल्या प्रिय, जवळच्या व्यक्ती पर्यंत जरुर पोहोचवावे.

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

comedy marathi ukhane
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, ____भाव देत नाही किती केले ट्राय…!!!
मारीची बिस्कीट आणि सोसायटी चा चहा, मारीची बिस्कीट आणि सोसायटी चा चहा, माझे नाव घेताना ____ किती लाजते पहा…!!!
अमेरिकेत येऊन मराठी मंडळ केलं join, अमेरिकेत येऊन मराठी मंडळ केलं join, सर्व कार्यक्रमांमध्ये ____ राव मारतात Shine …!!!
शिक्षण खूप घेतले पण स्वभाव माझा सरळ आणि साधा, शिक्षण खूप घेतले पण स्वभाव माझा सरळ आणि साधा, मी आहे कृष्ण अन ती ___ माझी राधा…!!!
डाळीत डाळ, तुरीची डाळ, डाळीत डाळ, तुरीची डाळ… ___च्या मांडीवर खेळविण एक वर्षात बाळ…!!!
बटाट्याच्या भाजीत घातला एकदम tasty मसाला, बटाट्याच्या भाजीत घातला एकदम tasty मसाला, ___रावांच नाव माहितीये तरी मला विचारता कशाला…!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

Comedy Marathi Ukhane या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत असे उखाणे, जे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील. पारंपरिक ढंगाला आधुनिक विचारांची जोड देत, हे उखाणे 2026 च्या ट्रेंडनुसार तयार करण्यात आले आहेत. लग्नसमारंभ, हळद, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा कौटुंबिक कार्यक्रम—प्रत्येक प्रसंगासाठी योग्य असे मजेदार उखाणे येथे तुम्हाला मिळतील.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात उखाणे फक्त कार्यक्रमापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. Instagram Reels, WhatsApp Status, YouTube Shorts यावरही उखाणे व्हायरल होत आहेत. म्हणूनच या ब्लॉगमधील उखाणे Short, Catchy आणि Viral-friendly स्वरूपात लिहिलेले आहेत, जे वाचायला, म्हणायला आणि शेअर करायला सोपे आहेत.

सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना, माझ्यासाठी चार साड्या आणि दोन ड्रेस घेईन….!!!
वाड्यात गच्ची, गच्चीत झाड, झाडाला फुले, फुलांचा पडलाय सडा…. वाड्यात गच्ची, गच्चीत झाड, झाडाला फुले, फुलांचा पडलाय सडा…. ____ रावांच नावं घेते तुमच्या आईचा…….. सुंदर आहे वाडा…!!!
डब्यात डब्बा, डब्यात केक… डब्यात डब्बा, डब्यात केक… कधी होणार आपलं आडनाव एक…!
एकविसाव्या शतकातील कठीण आहे हा काळ, एकविसाव्या शतकातील कठीण आहे हा काळ, दिलेला शब्द पाळ आणि वर्षभरात होवू दे बाळ…!
डाळीत डाळ तुरीची डाळ, डाळीत डाळ तुरीची डाळ… डाळीत डाळ तुरीची डाळ, डाळीत डाळ तुरीची डाळ… एवढी घाई नको करू राव, नंतर पस्तावशील रे बाळ…!
चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा बोलेना, चाफा चालेना, ____ रावांच माझ्याशिवाय पानच हलेना…!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

Comedy Ukhane | खान्देशी उखाणा

comedy marathi ukhane
सोन्याची सायकल, चांदीची सीट …. सोन्याची सायकल, चांदीची सीट …. ___ हिची अन माझी जोडी खूपच आहे सुपर हिट..!!!
श्री गणेशाच्या प्रासादामध्ये महत्वाचा आहे पेढा, श्री गणेशाच्या प्रासादामध्ये महत्वाचा आहे पेढा, ____ साठी मी झालो प्रेमात पूर्ण वेडा…!!!
IPL लागल्यावर बघत होतो क्रिकेट, ऐका लक्ष देऊन…. IPL लागल्यावर बघत होतो क्रिकेट, ऐका लक्ष देऊन…. ____च नाव घेतो पडली ना माझी पण विकेट…!!!
सुंदर-सुंदर हरणाचे, नाजूक नाजूक पाय… सुंदर-सुंदर हरणाचे, नाजूक नाजूक पाय… आमचे हे दिसत नाहीत पिऊन पडले की काय…!!!
खान्देशी उखाणाशहाजहानन बायकोसाठे बांधला इतला सुंदर ताजमहाल… शहाजहानन बायकोसाठे बांधला इतला सुंदर ताजमहाल… तुमी भाड्याना घरमाच रहा, तुमले काय परवडीन महाल…!!!
— खान्देशी उखाणा —नवीन शेजारीनंचे गुण किती, इतली भारी काढते रांगोळी… नवीन शेजारीनंचे गुण किती, इतली भारी काढते रांगोळी… आम्हीन कितीबी करा पन आमच्या नशिबात फक्त जयेल पोरी…!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आपण जेव्हा नाव/उखाणा (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते अवघड किवां खूप लांबलचक असण्याची गरज नसते. ते फक्त चालू घडामोडींच्या आशय घेऊन केलेली एक काव्यात्मक शब्दरचना असावी, जेणेकरून उखाणा ऐकणाऱ्याचे समाधान होवून हास्याची लकेर उमठेल. कारण ऐकणाऱ्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी आपण शब्दांद्वारे कश्या व्यक्त करतो ह्या मध्ये जास्त रस असतो. आणि त्यानंतर होणारा हास्यकल्लोळ सर्वांनाच हवा-हवासा वाटतो.

Comedy Ukhane | खान्देशी उखाणे

comedy marathi ukhane
खान्देशी उखाणाताजमहाल बी बांधला असता, पण समोर पायजे तशी मुमताज…. ताजमहाल बी बांधला असता, पण समोर पायजे तशी मुमताज…. अन काहींले कुत्र बी हुंगत नही, पण त्येचा लगे ऐश्वर्या सारखा माज….!!!
खान्देशी उखाणा- जव्हाय तव्हाय नुसता नाव ठेवस, तरी भी गपा गप हादाडस…. जव्हाय तव्हाय नुसता नाव ठेवस, तरी भी गपा गप हादाडस…. शेजारीन खरंच गुनानी हे, ती म्हणून नवराले रोज बदडस…!!!
खान्देशी उखाणा…शंकर अन पार्वती रहातास कैलास पर्वतावर…. शंकर अन पार्वती रहातास कैलास पर्वतावर…. जर लवकर घर उना नाही तू, तर झपन पडीन वटावर…!!!
खान्देशी उखाणा….आजचा दिवस पवित्र, आज हाये महाशिवरात्री… आजचा दिवस पवित्र, आज हाये महाशिवरात्री… परत परत फोन करजो नको, मी उशिरा यीन रात्री…!!!
खान्देशी उखाणे….लय डोकं दुखी रह्यान, लेता का फरशी पुशी? लय डोकं दुखी रह्यान, लेता का फरशी पुशी? मान नही दिधा म्हणून, नणंद बाई गई रुशी…!!!
खान्देशी उखाणे…मले काम सांगाले उनी मोठी महाराणी, आवं जाय आठून फुट…. मले काम सांगाले उनी मोठी महाराणी, आवं जाय आठून फुट….भाजी खुटी गई त तू टाकस शेंगादानान कुट…!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

ह्या POST (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) आम्ही मुख्यत्वे Comedy/मजेदार उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. उखाणा जर नवीन किवां मजेदार असेल तर तो जुना म्हणजेच नेहमी घेतला जाणारा आणि कंटाळवाणा वाटत नाही. तेव्हा जर तुम्ही चांगला उखाणा घेतला तर सर्वांचा मनावर एक सुंदर छाप निर्माण होवून आपल्याला एक सुंदर आठवणही राहील.

इडली साठी पीठ पाहिजे असत आंबवलेल, इडली साठी पीठ पाहिजे असत आंबवलेल, आमचे हे दिसतायेत फार तुंबलेल …!
गर गर गोल फिरतो भंवरा, गर गर गोल फिरतो भंवरा, ___ च नाव घेतो मी तिचा नवरा…!!!
उगवला सूर्य, झाली पहाट, उगवला सूर्य, झाली पहाट, मी नटून तयार झाले की ____ राव बसतात मला पाहत..!!!
propose केलं होत मी तुला देऊन गुलाबच फुल, propose केलं होत मी तुला देऊन गुलाबच फुल,___ शी लग्न झालाय पण एवढ्यात नाही हा मुल!
नणंद बाई आमच्या करते भलताच नखरा, नणंद बाई आमच्या करते भलताच नखरा, ___ राव झाले बळीचा बकरा!
बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…. बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…. ____रावांना डोळे मारण्याची, फार जुनी खोड….!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

नेहमी आपल्या आवडीचे मजेदार ३-४ उखाणे (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) तोंडपाठच असले पाहिजे, कारण लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरही किमान १ वर्ष कोण कधी “नाव घ्या” म्हणेल याच्या काही नेम नाही. त्यामुळे आपल्याला जर अजून मराठी उखाणे हवे असतील तर नक्कीच आमच्या इतर उखाणे POST/Page वर जाऊन हवे तसे उखाणे शोधू शकता. आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा.

comedy marathi ukhane
माझ्या ____ रावांचा चेहरा आहे खूपच हसरा… माझ्या ____ रावांचा चेहरा आहे खूपच हसरा… टेन्शन प्रोब्लेम सगळे क्षणामध्ये विसरा….!!!
छोट्या टेकडीवर बांधले मोठे फार्म हाउस, छोट्या टेकडीवर बांधले मोठे फार्म हाउस, घास भरवतो _____, बोट नको चावूस…!!!
आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई… आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई… ____रावांच्या बाळाची आता होणार मी आई…!!!
शंकराला बेल, विष्णूला तुळस…. शंकराला बेल, विष्णूला तुळस…. _____रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस…!!!
उंदीर रहातो, ती जागा असते बीळ, उंदीर रहातो, ती जागा असते बीळ, घायाळ करतो ____ च्या गालावरचा तीळ…!!!
माधुरीची अदा, कतरिनाच रूप, माधुरीची अदा, कतरिनाच रूप, ____ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप….!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आम्हा दोघांची, स्वर्गात बांधली गाठ… आम्हा दोघांची, स्वर्गात बांधली गाठ… ____रावांचे नाव मला, अगदी तोंडपाठ…!!!
रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, ____ रावांना तिशीतच पडले टक्कल…!!!
गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर, गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर, ____ला पाहताक्षणी उघडले मनाचे शटर…!!!
____सोबत असली की, खराब मूड होतो बरा, ____सोबत असली की, खराब मूड होतो बरा, ___मुळे कळला जगण्याचा आनंद खरा…!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व मजेदार (comedy marathi ukhane | मजेदार मराठी उखाणे) उखाण्यांमध्ये __ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आमच्या Visualमराठी ह्या Web Portal वर आपल्याला वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असतो की आपल्या पर्यंत मराठी तील नवीन Content पुरवावे.
अश्याच Comedy/मजेदार (comedy marathi ukhane) उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू.

Comedy/मजेदार उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.

Scroll to Top