(inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स )जीवन म्हणजे सुख-दुःख, आशा-निराशा यांचा असणारा चढ-उतार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळानुसार चढ-उतार येताच असतात. खासकरून जेव्हा वाईट वेळ चालू असते तेव्हा नैराश्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि आपण खिन्न होतो. ह्या काळामध्ये जर प्रेरणादायी प्रेरक शब्द (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) कानावर पडले, ऐकले किवा कोणी सांगितले तर नैराश्यातून बाहेर येण्यास आणि जीवन पुन्हा नव्या जोमाने जगण्यासाठी उभारी येते.
कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती आपल्या वैचारिक पातळीवर सर्वांना आपली-आपली मोठीच जाणवते. अश्या वेळी आपण आवर्जून सकारात्मक विचार, आपल्या इतिहासातील पराक्रमी लोकांचे विचार, जगातील थोर विचारवंत ज्यांनी जीवनात अनेक समस्यांना बेधडक तोंड दिले यांचे विचार वाचले तर नक्कीच आपल्यातही सकारात्मक उर्जा संचारून आलेल्या वाईट परिस्थिती तसेच नैराश्य यावर जरूर विजय मिळविता येतो. म्हणूनच Visualमराठी आपल्या सर्वांसाठी प्रेरक मराठी कोट्स (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) चा खजिना घेऊन आलेलो आहोत. आपण स्वतः वेळो-वेळी वाचत जाच पण आपल्या जवळच्या व्यक्ती जे सध्या वाईट काळाचा सामना करत आहेत त्यांनाही आवर्जून Share करा. जेणेकरून त्यांनाही मदतच होईल.
त्यामुळेच VIsualमराठी आपल्यासाठी प्रेरक मराठी कोट्स (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!
घडाळाच्या अलार्म ने व्यक्ती कधी उठत नाही,
त्याच्या पाठीवर असलेल्या जबाबदाऱ्या त्याला आपोआप उठवतात.
लाखाची सोबत असून काहीच उपयोग नाही,
एकाच असावा पण लाख मोलाचा असावा…
तुमचे कितीही वय असेल किवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
आयुष्यात ३ संघर्ष असतात.
१. जगण्यासाठीचा संघर्ष
२. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
३. ओळख टिकविण्यासाठीचा संघर्ष.
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात,
तसचं प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोकं जास्त त्रास देतात..!
चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते,
कारण चतुरपणाला चार दिवसाची चमक असते,
पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत रहातो…
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते….
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
इतिहास हा जिंकण्याचाच असतो,असं काही नसत…
पराजायाचीही इतिहासात नोंद होते फक्त इतकंच संघर्षात दम असला पाहिजे.
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

“संघर्ष” मोठा आहे कारण ध्येय मोठ आहे आणि
कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही ही पण काळ्या दगडावरची रेषा आहे.
सोबत कितीही लोकं असू द्या संघर्ष स्वतः लाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका,
स्वतः लाच भक्कम बनवा.
अधिक Motivaltional Post वाचा –
ज्याला संधी मिळते तो नशीबवान,
जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता.
काट्यावर चालणारी व्यक्ती ध्येया पर्यंत लवकर पोहोचते
कारण रूतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतः शीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही.
तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल
तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

आयुष्य निवांतपणे त्यांनाच जगता येत जे स्वतःच्या मनाप्रमाणे जगतात…
नाहीतर दुसऱ्याचे मन जपण्याचे संस्कार ज्यांना मिळाले आहे
त्यांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आला आहे..
जबाबदारी ची जाणीव असली की सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नाही.
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करणे म्हणजे आयुष्य जगणे.
जिथे आपण ठेच लागून पडतो,
तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची
मग ती पायाला असो किंवा मनाला,
पायाची ठेच शरीर जपायला शिकवते
तर मनाची ठेच ही माणसं ओळखायला शिकवते..
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी…
दुसऱ्याकडे काय आहे, हे पाहून सुखाची स्पर्धा केली,
तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही.
जिवनात आनंदी राहायचे असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या,
जो जगाकडे बघून निर्णय घेतो तो जिवनात कधीच यशस्वी होत नाही.
संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो,
बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख देतात.
जेव्हा जेव्हा आम्हाला कर्म विचारलं जाईल,
तेव्हा तेव्हा आम्ही कृष्ण सांगु...
आणि जेव्हा जेव्हा आम्हाला धर्म विचारल जाईल,
तेव्हा तेव्हा आम्ही शिवबांचा छावा सांगु…
आयुष्यात प्रत्येक वादळ उद्धवस्त नाही करत,
काही वादळं दिशा दाखवण्यासाठी आलेली असतात.
अधिक Motivaltional Post वाचा –
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

आयुष्यात पुढं जायचं असेल तर स्वतःला कधी कमी समजायचं नसतं..
जेव्हा खिश्यामध्ये एक रुपया नसतो,
तेव्हापासून ते तुम्ही यशस्वी होईपर्यंत सोबत असतो तोच तुमचा खरा मित्र असतो..!
“यशाकडे जाणारी पहिली पायरी असते
स्वतःचेच नेतृत्व अतिशय उत्तमरीतीने करणे.”
आयुष्यात कोण कसं वागलं, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा
आपण पुढे कस वागायचं याचा विचार केलेला चांगला.
जिथं श्रीकृष्णांच ज्ञान आणि अर्जुनाची मेहनत आहे तिथं विजय निश्चित आहे !
स्वतःवर काम करा,
कारण जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट तुम्ही स्वतः आहात !
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही..
आपण सगळंच समजून नाही घेऊ शकत हा समजूतदारपणा आला की आयुष्य सुंदर होत !
स्वतःची ओळख स्वतः तयार करा उद्या कोणी म्हणायला नको याला मी मोठं केलंय !
संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो जग ज्ञान देत, साथ नाही…!
जे घडलं ते सोड जे घडवायचं आहे, त्यासाठी लढ…!..
फक्त इतकचं प्रामाणिक राहायचं की
जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माच फळ मिळेल..
तेव्हा आनंद व्हायला हवा भीती नव्हे…
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

कमवणं कठीण नसतं, कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं..
दिवस प्रत्येकाचे पलटत असतात
थोडी सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या राहणार नाही…!
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते..!
गमावणाऱ्याला पशच्याताप होईल एवढं चांगलं तर नक्कीच बना..
टीप – (inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स ) वाचून आपल्याला प्रेरक वाटले असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत share करायला विसरू नका.

माणसाच्या जीवनात दोन गोष्टी महत्वाच्या असतात.
एक पंगत आणि दुसरी संगत. चुकीच्या पंगतीत बसलं कि पोट बिघडतं
आणि संगत चुकीची भेटली कि आयुष्य बिघडतं.
म्हणून दोन्ही गोष्टी विचार करून निवडाव्या..
माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली..!
चुकीच्या संगतीपेक्षा एखादा एकटेपणाचा दिवस बरा,
आई म्हणते पोट बिघडल्यापेक्षा एक दिवस उपवास बरा.
स्वतःला उजळण्यासाठी स्वतःला जाळावं लागेल,
दररोज मरण स्वीकारून सुतक ही पाळावं लागेल!
रचत रचत थर परिश्रमाचा कट्यांमध्ये लोळावं लागेल,
यशाच गाडगं फुटेपर्यंत तुला नियतीशी खेळावं लागेल !
inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स !
अश्याच नवीन प्रेरक विचार/कोट्स, शुभेच्छा संदेश, मराठी उखाणे, मराठी सुविचार, कविता, म्हणी, मराठी नावे यांच्या संग्रहसाठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा.
वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आहे, आणि तिचे वेगळेपण संपूर्ण जगाला काही वेगळे सांगणे नको. त्यामुळे मराठी भाषेतील इंटरनेट Content आपल्या समोर सादर करण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता. तसेच आपले अजून काही सल्ले, विचार, सूचना आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या प्रत्येक गोष्टींचा जरुर विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोडविण्याचा प्रयत्न करू.
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!