rakshabandhan wishes in marathi 2025 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२५
“रक्षाबंधन बद्दल थोडक्यात माहिती!”
(rakshabandhan wishes in marathi 2025 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२५) “राखी” ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे “रक्षण कर/कर्ता” – “राख म्हणजे सांभाळ‘ हा संकेत आहे. (राखी पौणिमा) रक्षाबंधन हा श्रावण मासातील प्रमुख सण आहे. भाऊ-बहिणीच्या अनमोल नात्यातील प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या पुढील वाटचालीसाठी,सुखासाठी आणि उदंड आयुष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे, तिला सुखी, आनंदी ठेवण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचे मुख्य महत्त्व म्हणजे या दिवशी बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात, त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम, काळजी आणि रक्षण यांचे ते प्रतीक आहे. त्या बदल्यात भाऊ अनेकदा त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात.त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला rakshabandhan wishes in marathi 2025 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..तू माझी बहिण मी तुझा भाऊ, प्रेमच हे नात असंच अतूट ठेवू, नाकी कसला स्वार्थ त्यात नको जराही राग, प्रेमाच्या ह्या बंधनात असू दे प्रेमाची साथ….रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मायेचं साजूक तूप, आईचं दुसर रूप, काळजी रुपी धाक, प्रेमळ तिची हाक, कधी बचावाची ढाल, कधी मायेची उबदार शाल…म्हणजे माझी प्रिय “बहिण”…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
असो थोडा रुसवा असावा जरा धाक, प्रेमाच्या ह्या बंधनात सोडू नको कधी साथ, तू माझी बहिण, मी तुझा भाऊ, प्रेमच हे नात असंच अतूट ठेवू…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीच हे नात खूप खुप गोड आहे….रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःख तुझे सारे हे मजपाशी येवो, सुखाने आनंदाने तुझे जीवन सरो, तुझी माया तुझ प्रेम निरंतर असेच राहो, प्रेमाच हे नात असचं घट्ट राहो, तू माझी बहिण, मी तुझा भाऊ, प्रेमच हे नात असचं अतूट ठेवू…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भांडणातलं प्रेम म्हणजे भाऊ बहिणीच प्रेमळ नात.!!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(rakshabandhan wishes in marathi 2025 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२५)
राखी पोर्णिमा बद्दल निश्चित पुरावा नाही, पण त्याविषयी एक आख्यायिका आहे की, धार्मिक उल्लेखानुसार राखी पौर्णिमेची सुरुवात सांगायची झाली तर असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्राने आक्रमण केले तेव्हा शिशुपालाचा वध केल्यावर ते चक्र पुन्हा श्रीकृष्णाच्या बोटात आले व बोट कापले, तेव्हा द्रौपदीने बहिणीच्या भावनेने लगेचच तिच्या साडीतून कापडाचा तुकडा श्रीकृष्ण यांच्या हातावर बांधला, ज्यामुळे रक्तस्त्राव थांबला . या घटनेनंतर, कापडाचा तुकडा एक पवित्र धागा मानून, भाऊ-बहिणीच्या गोड नात्यासाठी दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतात.राखी एक प्रेमाचं प्रतिक आहे, राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो… रक्षाबंधन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!!!
जपावे या बंधानास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ती ज्ञानेश्वराने. रक्षाबंधन निमित्त खूप खूप शुभेच्छा!
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे, भाव-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे…! रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहिण-भावाचा पवित्र सण. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
भाऊ-बहिण म्हणजे पान नाही सुकायला, भाऊ-बहिण म्हणजे फुल नाही कोमेजायला, भाऊ-बहिण म्हणजे फळ नसते पिकायला, भाऊ-बहिण म्हणजे फांदी नसते तुटायला, भाऊ-बहिण म्हणजे मूळ असते एकमेकांना “आधार” द्यायला….रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गर्व तर एवढ्याच गोष्टींचा आहे कि, माझा भाऊ थोडा खडूस तर नक्की आहे, पण मला समजून घेणारा आणी प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीमागे नाहीतर सोबत उभा राहणारा आहे….रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जशी सोन ठेवायला तिजोरी लागते ना तशी मनातली प्रत्येक गोष्ट सांगायला हक्काची व्यक्ती अन ती व्यक्ती म्हणजे आपली बहिण असते… मग ती लहान असो की मोठी…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊ म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची…! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे त्यांची काळजी घेणारा भाऊ असतो….रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अडचणीच्या काळात वाट दाखवणारा भाऊ असला तरी, खचलेल्या मनाला आधार देणारी बहीणच असते! Happy Rakshabandhan!
कुणाच्या जखमेवर प्रेमाने पट्टी कोण बांधणार, जर बहिण नसेल तर हातावर राखी कोण बांधणार…. राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
भाऊ म्हणेज एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक आयुष्यभराची अनमोल साथ…! राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

(rakshabandhan wishes in marathi 2025 | रक्षाबंधन शुभेच्छा २०२५)
थोडी लढणारी, थोडी भांडणारी,थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी….मस्ती करणारी एक बहिण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!आयुष्यात कितीही वादळ आली तरी त्यांना देऊ शकते मात, जेव्हा बहिणीला असते आपल्या लाडक्या भावाची साथ…! राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
फक्त भावाचच नात असं आहे जे वडिलांप्रमाणे तुम्हाला धाक दाखवू शकत, आईप्रमाणे प्रेम करू शकत आणि मित्रांप्रमाणे तुमच्या सोबत प्रत्येक कठीण प्रसंगात उभं राहू शकत,,,! रक्षाबंधनाच्या सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा!
सोबत राहिल्याने बहिण भावाच आयुष्य होत पूर्ण, बहिण भावाशिवाय ह्या आयुष्याच वर्तुळ आहे अपूर्ण…! राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
चंद्राच्या सोबतीला चांदणी असते, फुलाच्या सोबतीला दरवळणारा सुगंध असतो, झाडाच्या सोबतीला सावली असते, तसेच माझ्या सोबतीला सावलीसारखी उभी माझी ताई असते…. राक्षबंधांच्या मनापासून शुभेच्छा!
नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे त्यांची काळजी घेणारा भाऊ असतो….रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊ-बहिणीच नात हे जेवणातल्या मिठासारख असत, पाहिलं तर दिसत नाही आणि नसेल तर जेवण जात नाही…! Happy Rakshabandhan!
भावाबहिणीचे नाते हे वेगळेच असते, वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत…! राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
एक बहिणच अशी असते कि ती तिच्या भावाला कधी चुकीचं नाही समजत… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
कधी बचावाची ढाल, तर कधी मायेची उबदार शाल, जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण, तो झाड आणि मी त्याचे पर्ण…सर्वांना रक्षाबंधनाच्या मनः पूर्वक शुभेच्छा! Happy Rakshabandhan!
वडिलांच्या नंतर या जगात मुलीवर सर्वात जास्त प्रेम फक्त तिचा भाऊच करू शकतो… राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई, पण या जगात सगळ्यात भारी आपली ताई… रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Recent Posts
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle