dasra wishes in marathi 2025 | दसरा शुभेच्छा २०२५
दसरा किवा विजयादशमी
(dasra wishes in marathi 2025 | दसरा शुभेच्छा २०२५)
आपल्या भारत देशामध्ये सगळीकडे लोक दसरा किवा विजयादशमी हा सण/उत्सव सर्वजण आपआपल्या समजुतीनुसार किवां तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार किवा जुन्या रूढी परंपरानुसार साजरा करताना आढळतात. देशाच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत व पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या धारणा, विचारसरणी आणि समजुती ह्या सणा बद्दल आहेत. परंतु सर्वानुमते आणि पौराणिक कथांचे जर आकलन केले तर असे आढळून येते कि हा सण प्रामुख्याने अन्यायावर न्यायाचा, अज्ञानावर ज्ञानाचा, वाईटावर चांगल्याचा किवां द्वेषावर प्रेमाचा विजय दर्शवितात. हिंदू संस्कृतीतील महाकाव्य रामायणाचा उल्लेख जर तपासला तर असे आढळून येते की, प्रभू श्री राम वनवासामध्ये असताना, रावण नावाच्या राक्षसाने माता सीतेचे अपहरण केले होते आणि त्यांना लंकेमध्ये अशोक वनात बंदिस्त केले होते. त्यामुळे प्रभू श्री रामांनी आपला भाऊ लक्ष्मण आणि भगवान हनुमान तसेच वानर सेनाच्या मदतीने लंकेच्या दिशेने हल्ला केला होता. त्यानंतर बऱ्याच शांती प्रस्थावा नंतरही शेवटी प्रभू श्री राम आणि रावण यांच्या मध्ये युद्ध सुरु झाले. ह्या युद्धानंतर दहाव्या दिवशी प्रभू श्री रामांनी रावणाचा वध केला आणि युद्धात विजय मिळविला. तेव्हापासून ह्या सर्व गोष्टीचे प्रतिक म्हणून आपण सर्व भारतीय लोक दरवर्षी दसरा किवां विजयादशमी आपण साजरी करतो. तसेच आपले भारतीय सण भौगोलिक, वातावरणीय बदल अश्या गोष्टीना अनुसरुनंही असतात त्यामुळे दसर्याचे वेगळेपण म्हणजे ह्या दिवसापासून हिवाळा ऋतूची खरी सुरुवात होते असे समजतात.
त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला dasra wishes in marathi 2025 | दसरा शुभेच्छा २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय व्यक्तींसोबत जरूर Share करा..
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..!
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे…
विजयादशमीच्या शुभेच्छा…!
आनंदाची तोरणे बांधू दारी,
रांगोळीने सजवू आंगण
विजयोत्सवाचा दिवस आपुला,
करु आनंदाचे सिमोल्लंघन
विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(dasra wishes in marathi 2025 | दसरा शुभेच्छा २०२५)
अजून एक उल्लेख असाही आढळतो की देवी दुर्गा मातेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या अत्याचारापासून स्वर्गातील देवी देवतांचे तसेच पृथ्वी वरून सर्व मनुष्याचे रक्षण केले. खासकरून ही प्रथा पश्चिम बंगाल ह्या राज्यातील लोक आचरणात आणतात. दसरा/विजयादशमी च्या दिवशी आपट्याच्या पानाचे पण खूप महत्व आहे. ह्या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण एकमेकांना आपट्याची पाने “सोन” भेट म्हणू देतात.आला आला दसरा,
दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा
साजरा करु दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसऱ्याच्या शुभदिनी केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन नाही, तर आपल्यातील दुर्गुणांचेही दहन करूया.
रामाचे हृदयात स्मरण करून धर्ममार्गावर चालण्यास सुरुवात करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!
जाळूनी रावणरुपी अन्याय, लोभ, वासना, राग, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण होवो मनातील सर्व इच्छा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने,
या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!
दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!
त्याग केला सर्व इच्छांचा काहीतरी वेगळं करण्यासाठी, रामाने गमावलं खूप काही श्रीराम बनवण्यासाठी. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
निसर्गाचं दान अन् आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान. तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती आणि समाधान. आपणास आणि आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अधर्मावर धर्माचा विजय,
असत्यावर सत्याचा विजय,
वाईटावर चांगल्याचा विजय,
पापावर पुण्याचा विजय,
अत्याचारावर सद्गुणाचा विजय,
क्रोधावर दया आणि क्षमा यांचा विजय,
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय,
असा आहे “विजयादशमीचा” सण !
तुम्हाला व तुमच्या परिवाराल
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा,
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!
दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे
आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
दसऱ्याचा हा पवित्र सण…
तुमच्या घरात अपार आनंद आणो…
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत…
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा…!
दारात झेंडूचे तोरण लावून, रांगोळीमध्ये रंग भरू, गोडधोडाचा नैवेद्य करुन, अस्त्र, शस्त्रांचे पूजन करुन करुयात दिन हा साजरा, तुम्हां सर्वाना माझ्या तर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

(dasra wishes in marathi 2025 | दसरा शुभेच्छा २०२५)
तसेच दसरा आणि रामायण यांचे अतूट नाते असल्यामुळे भारताच्या अनेक प्रदेशामध्ये रामलीलाचे आयोजन करतात, जेणेकरून नव्या पिढीला रामायण बद्दल कुतहूल निर्माण होवून त्याबद्दल जनजागृती सुद्धा होईल. रामलीला झाल्यानंतर नाटकीय रुपांतराद्वारे त्या नंतर रावण रुपी पुतळा उभारून संध्याकाळच्या वेळी त्याचे दहन केले जाते.उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा… नवे जुने दुःख विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा. दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!
नवी पहाट, नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा, नवे स्वप्न नवीन आकांक्षा, विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा…!
मनात मान तेच सोन्याचं पान…! विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा…!
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची….! विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा…!
वाईटाचा होतो एक दिवस नक्कीच नाश, हाच आहे दसऱ्याचा संदेश खास,
या दिवशी आपणा सर्वांना सुखशांती लाभो आणि दूर होवोत सर्व चिंता व कलह…!
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर, असत्यावर, अज्ञानावर विजय
मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या २०२४ विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून,
सीमोल्लंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत,
आपण एकजुटीने संकटाचा एकहातरुपी रावणाचा नाश करुया..!
श्य आणि अदृश्य वाईट वृत्तीचा विनाश होवो, सत्याच्या आणि असत्याच्या लढाईत नेहमी सत्याचाच विजयी होवो,
दसरा म्हणजे सत्याचे प्रतीक असतं,
आपल्या सर्वांच्या जीवनात हा दसरा आनंदाचा आणि भरभराटीचा असो,
हा दिवस आपल्याला आठवण करुण देतो की शेवटीा सत्याचा विजय होतो आणि वाईट गोष्टिंचा शेवट होतो..!
तुमचे सर्वांचे आयुष्य ह्या दसऱ्याच्या दिवशी सुख समाधानाने, आनंदाने, भरभराटीने, उज्ज्वल यशाने आणि
आर्थिक विकासाने समृद्ध होवो हीच सदिच्छा..!
हा दिवस आपल्याला आठवण करुण देतो की शेवटी
चांगुलपणाचा, ज्ञानाचा आणि सत्याचा नेहमी विजय होतो आणि वाईट गोष्टिंचा शेवट होतो.
हिंदू संस्कृती हिंदूत्व आपली खरी शान,सोने लुटून साजरा करुया
दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान..!
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी,
घरट्याचे काय आहे,बांधता येईल केव्हा ही क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी..!
दसर्याचा हा उत्सव घेऊनी आला सोन्याच वरदान,
मंग मुहूर्तावर करुया एकमेकांना प्रेमाच दान..!
श्रीरामाचा आदर्श घेऊन, रावणरुपी अहंकाराचा नाश करत…
आजचा दिवस दसरा साजरा करुया
Recent Posts
मनामनात हर्ष दाटला आनंदाने नटू चला,
आसमंत हा गेला उजळुन दसर्याचे सोने लुटू चला..!
उत्सव आला विजयाचा दिवस सोन लुटण्याचा,
नव जूण विसरुन सारे फक्त आनंद वाटण्याचा….
तोरण बांधू दारी घालू रांगोळी अंगणी
करु उधळण सोन्याची जपू नाती मनामनांची….
🌸दसर्याच्या हर्दिक शुभेच्छा 🌸
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा, दसरा आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा…!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे… सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस… सोनेरी दिवसाच्या सोन्यासारख्या लोकांना, सोनेरी शुभेच्छा शुभ दसरा…!
स्नेहभाव वाढवून प्रेमाचे आणि यशाचे पूर्ण वाट, एकेकांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण करा, याच आपणास सदिच्छा!
मुहूर्त हसरा नाव्संकाल्पाचा, सण दसरा हा उत्कर्षाचा, चैतन्यास संजीवनी लाभोनी, होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा…!
मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल, आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान…!
मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल, आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान…!
पहाट झाली, दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळी, दारात तोरण, उत्सव हा प्रेमाचा, सोन घ्या सोन द्या…
दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूयात… निरोगी आरोग्याचे सोने…!
समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा हा हसरा सण… सोने लुटून हे शिलंगण, हर्षाचे उजळू द्या अंगण…
रावणाचा वध करुनी, राम राज्याने दिला आसरा… संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू साजरा दसरा…!
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा दसरा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला..!
सीमा ओलांडून आव्हानांच्या करू विजयाचा उत्सव साजरा… आनंद व आरोग्य जपण्याच्या निश्चयाचा सण हा आला दसरा.
Recent Posts
अश्याच नवनवीन दसऱ्यासारख्या भारतीय सण/उत्सवाच्या शुभेच्छा संदेशसाठी आमच्या website Visualमराठी ला नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्यास कटीबद्ध आहोत… धन्यवाद!
Table of Contents
Toggle