Budget 2025 in marathi | अर्थसंकल्प २०२५
नमस्कार मित्रांनो, आज ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी पुढील आर्थिक वर्ष (०१ एप्रिल २०२५ – ३१ मार्च २०२६) संबंधित अर्थसंकल्प (Budget 2025 in marathi | अर्थसंकल्प २०२५) भारताच्या संसदेमध्ये सदर झालेलं आहे. आजकाल सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये आर्थिक नियोजनाचे कुतूहल वाढलेले जाणवते. त्यामुळेच अर्थसंकल्प सारख्या विषयांमध्ये रुची आणि उत्सुकता ही बघायला मिळते. तसेच याबद्दल जाणून घेणाऱ्यांचा संख्येमध्ये ही भरपूर वाढ झालेली जाणवते. चला तर मग आज आपण अर्थसंकल्पाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय?
जसेकी आपल्याला कोणी विचारला की, “मागच्या वर्षी आपण किती पैसे कमावले ते पण वेग-वेगळ्या स्त्रोत मधून? आणि त्यापैकी किती रक्कम आपण कुठे खर्च केली आणि कशी?” तेव्हा आपण सविस्तर उत्तर देऊ शकतात की, “मागील वर्षी मी अमुक-अमुक रक्कम वेग-वेगळ्या कामा द्वारे कमविली आणि संपूर्ण वर्ष मध्ये सर्व खर्च बघता वेग-वेगळ्या ठिकाणी खर्च केली. आणि आता सध्या माझ्या कडे त्यापैकी एवढी रक्कम शिल्लक आहे किवा सगळी रक्कम संपून उलट माझ्यावर एवढ्या रकमेचे व्याज आहे!”. आता ह्या प्रश्नोतारावरून आपल्याला कल्पना आलीच असेल की भारत देश मध्ये पण देश चालविण्यासाठी काही मिळकतीचे स्त्रोत असतील आणि काही खर्चही असतील. ह्या सर्वांचा हिशोब/किवा ठोकताळा म्हणजे भारताचे अर्थशास्त्र. आता आपण नेमकं “अर्थसंकल्प” म्हणजे काय ते बघूया. अर्थशास्त्राची कल्पना आल्यानंतर आपल्याला अर्थसंकल्प ( Budget 2025 in marathi | अर्थसंकल्प २०२५) समजणे सोपे होईल.
आता आपल्याला जर कोणी दुसरा प्रश्न विचारला की, “ह्या वर्षी (२०२५) मध्ये आपण कुठून आणि किती पैसे कमावणार? आणि कमाविलेले पैसे कुठे-कुठे आणि कसे खर्च करणार आहात?” तर ह्या प्रश्नाचे उत्तर देताना आपण उदाहरण म्हणून सांगाल की “ह्या वर्षी मी २ कामे करून (नौकरी आणि एखादे अजून मिळकतीचे स्त्रोत जसेकी भाडे, शेतीचे उत्पन्न, छोटासा व्यावसायिक उत्पन्न) एक ठराविक रक्कम कमावेन आणि त्यानंतर घरखर्च, दैनंदिन गरजा, प्रवास, खरेदी, कर्जाची परतफेड इ. गोष्टींवर खर्च करण्याचे ठरविले आहे!” आता हा झाला आपला पुढील वर्षाचा अंदाज. हा अंदाज आपण मागील अनेक वास=वर्षी झालेल्या खरेद-विक्री, मिळकत आणि खर्च याच्या एकंदरीत अनुभवानुसार अंदाजे बनविला असेल. त्याच प्रमाणे एखादा देश (जसेकी भारत) वर्ष्याच्या सुरुवातीस येण्याऱ्या वर्षात होण्याऱ्या खरेदी आणि विक्री , मिळकत आणि खर्च या सर्व गोष्टींचा अंदाज बांधून एक मुद्देसूद परिपत्रक (document) सर्व देशाच्या नागरिकांसमोर मांडते त्याला म्हणतात एखाद्या देशाचा “अर्थसंकल्प”. (देशाचा अर्थसंकल्प मांडण्याचा हक्क फ्क्त सत्ताधारी पक्षाकडेच असते.) दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर अर्थसंकल्प (Budget 2025 in marathi | अर्थसंकल्प २०२५) म्हणजे एखाद्या देशाचे पुढील वर्षाचे आर्थिक समायोजन.
अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी/इतिहास
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताक होण्याआधी भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के. षण्मुखम शेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ला संसदेमध्ये सादर केला . जॉन मथाई यांनी भारत गणराज्य झाल्यानंतर (म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाल्यानंतर म्हणजेच भारत देशाचे लोकशाही नुसार संपूर्ण कारभार संविधान नुसार चालायला जेव्हापासून सुरुवात झाली) पहिला अर्थसंकल्प १९५० साली सादर केला. भारतात केंद्रीय अर्थमंत्री दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2025 in marathi | अर्थसंकल्प २०२५) लोकसभेत सादर करतात. फेब्रुवारीनंतर येणाऱ्या आर्थिक वर्षाचे(०१ एप्रिल २०२५ – ३१ मार्च २०२६) या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल, याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो.
अर्थसंकल्प बद्दलची संकल्पना आता आपल्याला व्यवस्तीत समजली असेल हे गृहीत धरून आपुन पुढील गोष्टी जाणून घेऊ. जसे की देशातील मिळकतीचे म्हणजेच कमविण्याचे स्त्रोत नेमके कोणते आहेत, देश त्यानुसार सर्व मिळकत आणि खर्चाचा हिशोब कसा ठेवते आणि विविध क्षेत्रावर नंतर खर्च पण कसा करते. जर ढोबळमानाने एखाद्या देशाचे एकूण उत्पन्न १०० रुपये पकडले (ह्या उदाहरणाने आपणास देशाचे उत्पन्न कसे मोजले जाते ह्याचा अंदाज येईल)आणि खर्च ही १०० रुपयेच पकडला तर आपल्या देशाची मिळकत/उत्पन्न समजेल आणि खर्च ही समजतील. आणि पूर्ण आर्थिक वर्षामध्ये कशी पैश्यांची उलाढाल होते हे समजेल.

अर्थसंकल्प मधील देशाचे उत्पन आणि खर्च
देशाचे अंदाजित उत्पन्न जर १०० रुपये आणि खर्च देखील १०० रुपये गृहीत पकडल्यास तर उत्पन्न कोण-कोणत्या क्षेत्रामधून होते आणि खर्च ही को-कोणत्या क्षेत्रावर होतो. कर प्रणालीतील बदल यात सुचीत केले जातात. कृषी, संरक्षण, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, संशोधन व विकास आदींबाबत तरतूद यात् केली जाते. अर्थसंकल्पाची तारीख एक महिना अलीकडे आणत 1 फेब्रुवारी केली आहे जेणेकरून आर्थिक वर्ष सुरुवातीलाच निधी उपलद्ध करायला वेळ भेटेल. अजूनही बऱ्याच गोष्टी अर्थसंकल्पामध्ये (Budget 2025 in marathi | अर्थसंकल्प २०२५) समाविष्ट असतात परंतु सामान्य नागरिक म्हणून ह्या Blog वर आपण फक्त अती महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
अर्थसंकल्प २०२५ मधील महत्वाच्या गोष्टी
मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील करप्रणालीमुळे मध्यमवर्गीय तसेच इतर अनेक नागरिकांमध्ये सरकार विरुद्ध आक्रोश दिसून येत होता. त्यामुळे ह्या वर्षी अंदाजे १० लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ०% कर सवलत मिळेल असा अंदाज होता परंतु सरकारने त्याही पुढे जाऊन १२ लाख उत्पन्न गटातील नागरिकांना ०% कर सवलत मिळेल (वेगळ भांडवली उत्पन्न नसलेल्या एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जर १२ लाख असेल तर त्याला ८० हजार कर भरावा लागत असे परंतु ह्या वर्षी त्यास १००% सूट देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या कर प्रणाली मध्ये ८ ते १२ लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर १०% कर दर्शविलेला आहे परंतु सरकार ते पुन्हा करदात्याच्या खात्यामध्ये परत पाठवणार आहे.) असे जाहीर केलेले आहे.

तसेच इतर उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी खालील प्रकारे कर प्रणाली असेल,
- ० ते ४ लाख (४,००,०००) उत्पन गट – ०% कर
- ४ ते ८ लाख (४,००,०००-८,००,०००) उत्पन्न गट – ५ % कर
- ८ ते १२ लाख (८,००,०००-१२,००,०००) उत्पन्न गट – १०% कर
- १२ ते १६ लाख (१२,००,०००-१6,००,०००) उत्पन्न गट – १५% कर
- १६ ते २० लाख (१६,००,०००-२०,००,०००) उत्पन्न गट – २०% कर
- २० ते २४ लाख (२०,००,०००-२४,००,०००) उत्पन्न गट – २५% कर
- २४ लाखांवर ३०% कर आकारला जाईल.1
- 25+ pola wishes in marathi 2025 | बैल पोळा शुभेच्छा २०२५
- hanuman chalisa marathi | मराठीमध्ये हनुमान चालीसा (संपूर्ण अर्थासहित)
- 50+ BEST international yoga day wishes in marathi 2025 | आंतराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा २०२५
- 100+ BEST thank you for birthday wishes in marathi 2025 | वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी धन्यवाद कोट्स २०२५
- 50+ BEST mothers day wishes in marathi 2025 | जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा २०२५
अर्थसंकल्प २०२५ विशेष
- पुढील आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक सदर केले जाईल.
- १२ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आयकरात मोठी सूट.
- मध्यमवर्गीय कर दात्यांना ह्या वर्षी दिलासा.
- जेष्ठ नागरिकांना TDS मर्यादा आता ५०,००० वरून १ लाख करण्यात आली आहे. तसेच घरभाडे पासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची TDS मर्यादा वाढवून 2.40 लाखांवरून वाढवून ही मर्यादा 6 लाख करण्यात आलीय.
- पंतप्रधान धनधान्य कृषी योजनाची घोषणा.
- किसान क्रेडीट कार्ड योजनेची कर्ज मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे.
- कर्करोगावरील औषधी आणि उपचार स्वस्थ करण्याची घोषणा.
- चालू वर्षात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा १०,००० ने वाढविणार, तसेच येत्या ५ वर्षांमध्ये ७५,००० वाढविण्याचे लक्ष.
- सरकारकडून ‘ग्यान भारतम मिशन’ जाहीर. याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तावेज, ऐतिहासिक हस्तलिखितं यांचा शोध घेण्यात येईल, त्यांचं जतन – डॉक्युमेंटेशन करण्यात येईल.
- लिथियम आयॉन बॅटरीज, सेमीकंडक्टर्स आणि अक्षय्य ऊर्जा उत्पादनासाठीच्या मशीनरीच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबाल्ट, लिथियम आयॉन बॅटरी स्क्रॅप, लेड, झिंक आणि 12 इतर खनिजांवरील बेसिक कस्टम्स ड्युटी हटवण्यात आली.
अश्याच नवनवीन post मराठी मध्ये वाचण्यासाठी आमच्या Website Visualमराठी नक्की भेट द्या.