“मनात माझ्या, मनात ग!” ( life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स ) आयुष्य म्हणजे जीवनातील चढ-उतार. हे होत असताना कधी कधी आपले मन कधी गुंतते, कधी हरवते, कधी विचारात पडत तर कधी हळवे होते. त्यात वेग-वेगळे विचार आणि भवनाचा कल्लोळ होतो तेव्हा विशिष्ठ गोष्टी आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात. त्यामधली एक गोष्ट म्हणजे हृदयस्पर्शी मराठी कोट्स(life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स ). जेव्हा मनात वेदना होवून, मन खिन्न झालेले असते तेव्हा एखादी हृदयस्पर्शी कोट्स आपल्या मनाला सावरायला आणि उभारी द्यायला पुरेसे असतो. त्यासाठी आम्ही VIsualमराठी आवर्जून आपल्या सर्व मराठी वाचकांसाठी हृदयस्पर्शी कोट्स चा खजिना आपल्या पर्यंत घेऊन आलेलो आहोत. आम्हाला कोट्स द्वारे तुम्हाला नाराज नाही करायचे परंतु तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायची आहे. आम्हाला आशा आहे संपूर्ण कोट्स आपण जरूर वाचाल आणि त्यातून एक सकारात्मक बोध घ्याल.
आजकाल Social Media वर व्यक्त होण्याचा जास्त कल दिसतो त्यामुळे आपणही आपल्या भावना Digital रुपात (life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स ) share करू शकता.आपल्या मनातील विचार आकर्षक शब्द रूपाने आपण share करा आणि आपले म्हणेन नक्की आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ पोहोचावा. धन्यवाद!
आपण चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका,
कारण लोकांना गरज पडली की,
आपण चांगले आणि गरज संपली की आपण वाईट होत असतो.
कठीण प्रसंगांत न मागता मिळालेली
साथ नेहमीच मोलाची ठरते,
जिथे सर्व संपल याची जाणीव होते
तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो…!!!
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडे आहें सोडवाल तितके थोडे आहे…!
माणसाने गर्दीत राहूनही एकटच असाव,
आपल्या वाटा आपण निवडाव्या…
ठेच लागली तर आपणच उठाव…
पण लक्षात असू द्याव…
हे एकाकीपण नैराश्यातून न येता…
विवेकातून जन्माला यावं..!
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते,
तुम्ही त्याला तोडा,घासा, पिरगाळा, ठोका किवा ठेचून बारीक बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल…!
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगत
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जागून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणी प्रत्येक हृदय जिंकत रहा.
रात्रभर गाढ जोप लागण याला सुद्धा नशिबाच लागत.
पण हे नशीब मिळविण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीच आयुष्य जगावं लागत.
अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे
स्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो
“सगळं व्यवस्थित होईल”.

जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायमच अवहेलना असते,
कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलीही तडजोड करत नाहीत…!
कोणी टाळावं तुला – एवढं स्वस्त होऊ नको..!
कोणी सांडावं तुला – एवढं जास्त होऊ नको…!
प्रेमळ नक्कीच ठेव स्वभाव तुझ्यातला पण,
गोड बोलून छाटतील गळा एवढा – मस्त होऊ नको…!!
जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता
ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही..!
नजर आणि नशीब यांचा एक विचित्र योगायोग असतो,
नजरेला नेहमी अशी गोष्ट आवडते,
जी बऱ्याच वेळा आपल्या नशिबात नसते.
कधी कधी आपलं शांत रहाणं खुप गरजेचं असतं,
आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात.
कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो पण ते टिकवून ठेवू शकत नाही.

कुणीही..
कुणालाही..
कसंही…
संपवू शकेल.
येवढं शुल्लक अस्तित्व कुणाचंच नसतं..!!
दुस-यांना समजून घेता घेता आपण
आपल्याला समजून घ्यायचं विसरतो.. आणि हे बऱ्याचदा घडतं.
वाईट वेळेत भेटलेली योग्य व्यक्ती
थकलेल्या मनाला आणि रुसलेल्या आयुष्यालाही हसायला शिकवते.

जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि
बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
जी गोष्ट आपली कधीच नव्हतीच,
त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा सापडलं होत,
परत हरवलं म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा.
स्वतःच्या नजरेत आदर्श रहा…
इतरांच्या नजरेला फारसं महत्त्व देऊ नका.
आयुष्यात आनंदी रहायचं असेल तर,
कुणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका…
कारण तुम्ही त्या व्यक्तीची किमंत वाढवता,
पण ती व्यक्ती तुमची किमंत शुन्य करून ठेवते.

“आयुष्याच्या रस्तावर चालताना पडलंच पाहिजे..
तेव्हाच तर कळतं,
कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय
आणि कोण सावरायला येतंय…!!”
चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं
ज्यांना आपण असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही…
त्यांना चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे.
आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे
ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.
“मी आहे ना नको काळजी करु”
असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल
तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते.
असावं एक तरी असं मुक्कामाचं ठिकाण
जिथं थोडा विसावा घेता येईल भावनांना..
वाचा फुटेल अन् जसेच्या तसे ते समोरच्याला उमजेल.
मनात भरून आलेलं सार आभाळ मोकळं व्हायला कधी कधी……
आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते…..!!

चहा गरम झाल्यावर वाफेसारखी उडणारी माणसे नसावीत,
माणसं असावी तर कपासारखी जी चटका सहन करूनही साथ न सोडणारी.
तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेऊ नका
कारण हळवं मन ज्याचं असतं नां
त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं..!!
life quotes in marathi | हृदयस्पर्शी मराठी कोट्स
अश्याच हृदयस्पर्शी मराठी कोट्स वाचण्यासाठी आणि इतर Social media app वर share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा.वाचाल तर वाचाल!आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर घेऊन येणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले विचार आणि अडचणी असतील, तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!हृदयस्पर्शी मराठी कोट्स सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.