waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती

waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती

नमस्कार मित्रांनो, सध्या वक्फ बोर्ड (waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती) आणि त्या संबंधित नवीन वक्फ बोर्ड बिल संसदेमध्ये सत्ताधारी पक्षांकडून सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुतूहल निर्माण होणे साहजिकच आहे. म्हणूनच Visualमराठी आपल्यासाठी वक्फ बोर्ड म्हणजे काय? वक्फ बोर्ड बिल मध्ये नेमके कश्यासाठी आणण्यात आले? अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर घेऊन आलेलो आहोत. आपण संपूर्ण माहिती जरूर वाचावी आणि शक्य असल्यास आपल्या भारतीय नागरिकांपर्यंत नक्की पोहोचावा, कारण मुद्दा जरी धार्मिक नसला तरी अज्ञानामुळे किवां राजकारणी नेत्यांच्या स्वार्थापोटी, अपूर्ण माहिती मुळे धार्मिक तेढ निर्माण होवून सामाजिक वातावरण विनाकारण खराब होवू शकते. म्हणूनच आपण सर्वांनी भारताचे नागरिक ह्या नात्याने व लोकशाही तील महत्वाचा घटक म्हणून ह्या सर्व गोष्टींकडे बघावे हीच अपेक्षा. धन्यवाद!

अधिक माहिती साठी आपण centralwaqfcouncil.gov.in ह्या Website ला भेट देऊ शकता.

वक्फ म्हणजे काय?

मोजक्या शब्दात सांगायचे झालेच तर , वक्फ म्हणजे इस्लाम धर्माचे पालन करणारे किवा इस्लाम धर्म मानणारे व्यक्तींनी धर्मासाठी/धार्मिक कार्यासाठी दान केलेली मालमत्ता, जी धार्मिक, सामाजिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी वापरली जाते. इस्लामी संस्कृतीनुसार वक्फ हा अरबी भाषेतील शब्द आहे. त्याचा नेमका अर्थ म्हणजे “राखून ठेवणे” असा होतो. इतिहासातील उल्लेखानुसार खलिफा उमर यांनी खैबर प्रांतातील जमीन विकत घेतली होती आणि त्या जमिनीचा धर्माच्या पवित्र कार्यासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करता येईल असा प्रश्न प्रेषित (मुहम्मद पैगंबर) यांना विचारला. त्यावर प्रेषितांनी असे उत्तर दिले की, ही जमीन राखून ठेवावी. त्या जमिनीची कधीही खरेदी-विक्री होता कामा नये, तसेच भेटवस्तू म्हणूनही त्याचे हस्तांतरण होता कामा नये आणि वारसाहक्काने तिचे हस्तांतरण पुढील पिढी कडे होता कामा नये. जमिनीचा वापर करून त्याचे उत्पन्न मुलांना, नातेवाईकांना मिळणार नाही याची काळजी घ्यावी. मुखत्वे करून जमिनीचा वापर मानवाच्या कल्याणासाठी तसेच गरिबांसाठी झाला पाहिजे. जेव्हा इस्लामिक राजवटीची भारतात सुरुवात झाली होती तेव्हा पासून वक्फ अंतर्गत भारतात मालमत्तेमध्ये वाढ होत गेली.

वक्फ बोर्ड काय करते?

वक्फ बोर्ड या मालमत्तेचे व्यवस्थापन करते आणि योग्य प्रकारे वापर सुनिश्चित करते.  वरील माहिती वाचून आपल्याला वक्फ(waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती) म्हणजे नेमकं काय हे कळाल असेलच. आता वक्फ बोर्ड बद्दल माहिती जाणून घेऊ.

भारतामध्ये इस्लामिक राजवटी झाल्या हे आपण सर्व जाणून आहोत, तेव्हा पासून वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांची संख्याही वाढत चालली होती. त्यामुळे या सर्व बाबी सांभाळण्यासाठी/नियंत्रण ठेवण्यासाठी ‘वक्फ बोर्ड’ ची भारतामध्ये स्थापना करण्यात आली. वक्फ अंतर्गत स्थावर आणि जंगम अश्या दोन्ही स्वरुपात मालमत्ता असू शकते. इस्लामी धर्माच्या परोपकारी कार्यासाठी इस्लामी व्यक्ती संपत्ती दान करू शकतात. तसेच इस्लामी कार्यासाठी दीर्घकाळापासून वापरातील जमीन, मालमत्ता ती वक्फची(waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती) मानली जाऊ शकते. मुखत्वे करून या संपत्तीचा वापर हा शैक्षणिक संस्था, मशिदी, निवारा आणि दफनभूमी सारख्या धार्मिक पण सामाजिक उन्नतीच्या कामा साठी केला जातो. जर एखाद्या व्यक्तीने दान केलीली मालमत्ता तो परत घेऊ शकत नाही. वक्फ कायद्यानुसार त्याचा कायमचा हक्क व संरक्षण वक्फ बोर्ड कडे राखीव असते.

जर एकद्यावेळेस वक्फ बोर्डाने तुमच्या वैयक्तिक संपत्ती वर दावा केल्यास न्याय मिळविण्यासाठी आपल्याला संवैधानिक कोर्टामध्ये जाता येत नाही. त्यासाठी आपल्याला वक्फ बोर्डाकडे अपील करावी लागते. तसेच तेथील निकालस कोणत्याही कोर्टामध्ये परत आवाहन देणाचे नियम सध्या तरी उपलब्ध नाहीये. परंतु तीउम्ही वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरण मध्ये जाऊन दाद मागू शकता, तेथे प्रशासकीय अधिकारी नियुक्त केलेले असतात. जे तुमच्या मुद्यांचा फेरविचार करून निकाल देऊ शकतात, परंतु तेथील निकालास ही तुम्ही परत हायकोर्ट किवां सुप्रीम कोर्ट येथे आवाहन देऊ शकत नाही.

waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती

आज भारतामध्ये एक केंद्रीय व एकूण ३२ राज्यांमध्ये वक्फ बोर्ड आहेत.

  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ
  • आंध्र प्रदेश वक्फ मंडळ
  • आसाम वक्फ मंडळ
  • बिहार सुन्नी आणि शिया वक्फ मंडळ
  • छत्तीसगड वक्फ मंडळ
  • दिल्ली वक्फ मंडळ
  • गुजरात वक्फ मंडळ
  • हरियाणा वक्फ मंडळ
  • हिमाचल वक्फ मंडळ
  • झारखंड वक्फ मंडळ
  • कर्नाटक वक्फ मंडळ
  • केरळ वक्फ मंडळ
  • मध्य प्रदेश वक्फ मंडळ
  • मणिपूर वक्फ मंडळ
  • मेघालय वक्फ मंडळ
  • ओडिशा वक्फ मंडळ
  • पंजाब वक्फ मंडळ
  • राजस्थान बोर्ड ऑफ मुस्लिम वक्फ
  • तामिळनाडू वक्फ मंडळ
  • पश्चिम बंगाल वक्फ मंडळ
  • त्रिपुरा वक्फ मंडळ
  • तेलंगणा वक्फ मंडळ
  • उत्तराखंड वक्फ मंडळ
  • उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ मंडळ आणि शिया वक्फ मंडळ
  • अंदमान निकोबार वक्फ मंडळ
  • चंदीगड वक्फ मंडळ
  • लक्षद्वीप वक्फ मंडळ
  • दादरा आणि नगर हवेली वक्फ मंडळ
  • पुद्दुचेरी वक्फ मंडळ

वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा यांची पार्श्वभूमी/इतिहास

waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती

ब्रिटीश कालीन राजवटीमध्ये वक्फ साठीचे नियमन करणारा पहिला कायदा (मुसलमान वक्फ कायदा 1923) १९२३मध्ये करून लागू करण्यात आला. त्यानंतर भारत ब्रिटीश राजवटी पासून स्वातंत्र झाल्यानंतर १९५४ मध्ये पुन्हा वक्फ बोर्ड साठी स्वातंत्र कायदा पारित करण्यात आला व केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली. पुढे १९९५ साली नरसिह राव यांच्या सरकाने १९५४ चा वक्फ कायदा रद्द करून नवीन वक्फ कायदा मंजूर केला, त्यामुळे वक्फ बोर्डास(waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती) व्यापक अधिकार प्राप्त झाले.

वक्फ कायदा, 1995: हा कायदा भारतातील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी आहे. 

वक्फ सुधारणा विधेयक, 2024: या विधेयकाद्वारे वक्फ कायद्यात बदल व सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे वक्फ बोर्डाची कार्यक्षमता अजून वाढेल. 

विधेयकातील प्रमुख मुद्दे:

  • वक्फ बोर्डाची रचना आणि कार्यपद्धती बदलणे. 
  • वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन सुधारणे. 
  • वक्फ बोर्डाला अधिक अधिकार देणे. 

वक्फ बोर्ड (waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती) यांचाकडील आजपर्यंतची जमा संपत्ती

अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार २००९ साली वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकर जमीन होती, त्यानंतर आजपर्यंत त्यामध्ये बरीच वाढ झालेली आहे. तसेच २०२२ पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण ८ लाख ६५ हजार पेक्षा जास्त मालमत्ता व ९.८ लाख एकर जमीन होती. सर्वेक्षण नुसार भारतीय रेल्वे, काथोलिक चर्च नंतर सर्वाधिक जमीन असलेले मालक म्हणजे वक्फ बोर्ड.


वक्फ बोर्ड बिल २०२५ विशेष

waqf board in marathi
waqf board in marathi | वक्फ बोर्ड संबंधित माहिती
  • वक्फ बोर्ड अंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टीमध्ये पारदर्शकता आणणे.
  • वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापनास बळकटी देणे.
  • वक्फ बोर्ड अंतर्गत मालमत्तेस संरक्षण देणे.
  • सर्व मालमत्तेचे योग्य सर्वेक्षण तसेच नोंदणी.
  • वक्फ बोर्ड संबंधित वाद-विवाद मिटविण्यासाठी व भविष्यात घडू न देण्यासाठी सूचना करणे.
  • वक्फ बोर्डाची रचना आणि कार्यपद्धती बदलण करणे. 
  • वक्फ बोर्ड व्यवस्थापनातील प्रशासकीय तुट भरून काढणे.
  • केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डामधील भाधार कांचे अपुरे प्रतिनिधित्व दूर करणे.

अश्याच नवनवीन post मराठी मध्ये वाचण्यासाठी आमच्या Website Visualमराठी नक्की भेट द्या.

55+ happy anniversary wishes in marathi | 55+ लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा
happy anniversary wishes in marathi

55+ happy anniversary wishes in marathi | 55+ लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा

लग्नाचा वाढदिवस म्हणेज लग्न झालेल्या जोडीच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा एक महत्वाचा दिवस (happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी…

40+ BEST hanuman jayanti wishes in marathi | ४०+ हनुमान जयंती शुभेच्छा
hanuman jayanti wishes in marathi

40+ BEST hanuman jayanti wishes in marathi | ४०+ हनुमान जयंती शुभेच्छा

सर्व हिंदू जण सागरास प्रभू श्री राम भक्त, भगवान शंकर अवतार श्री पवन पुत्र हनुमान जयंतीच्या ( hanuman jayanti wishes…

inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स
motivational quotes in marathi

inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स

(inspirational quotes in marathi | प्रेरक मराठी कोट्स )जीवन म्हणजे सुख-दुःख, आशा-निराशा यांचा असणारा चढ-उतार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळानुसार चढ-उतार येताच…