“ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः || ( shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स ) आपण सर्व श्री कृष्ण यांचे विचार/ कोट्स वाचण्यासाठी शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. श्रीकृष्ण यांना खासकरून भारतामध्ये आणि जगभरामध्ये मानणारा आणि त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचे प्रयत्न करणारा खूप मोठा वर्ग आहे. श्रीकृष्ण यांना विष्णू देवतांचा आठवा अवतार मानले जाते. तसेच त्यांना मानणाऱ्या समूहास “वैष्णव” पंथ म्हणून संबोधले जाते. तसेच हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवता मध्ये श्रीकृष्ण हे अव्वल आहेत. त्यांच्या जीवनाविषयी आणि अस्तित्वाविषयी सांगायला भरपूर आहे आणि बरेच लोक माहिती जाणून आहेत, परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीकृष्ण यांचे मानवी जीवनासंबंधीचे विचार जे आजही प्रत्येक क्षणाला अगदी तंतोतंत लागू होताना दिसतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, श्री कृष्ण यांनी महाभारतामध्ये अर्जुनाच्या जीवनाविषयी प्रश्नांची उत्तरे देतांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या आज “गीता” रूपाने आज आपण सर्व जण वाचतो. तर अश्या ह्या महान विचारांच्या सागरातील एक सूक्ष्म थेंब आम्ही तुमचा समोर घेऊन आलो आहोत.
श्री कृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी नमन…!
त्यामुळेच VIsualमराठी आपल्यासाठी वेगवेगळ्या देवी, देवता(shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स), संत, महात्मा व समाजसेवक यांनी जगासाठी दिलेले विचार/कोट्स मराठी मध्ये घेऊन आलेलो आहोत. आपण सर्व विचार/कोट्स जरूर वाचावे आणि आपला आप्त स्वकीयांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!
आयुष्य ना भूतकाळात आहे ना की भविष्यात,
आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात…
|| भगवान श्री कृष्ण ||
कृष्ण स्वर्ग,
कृष्ण मोक्ष,
कृष्ण परम साध्य आहे….
कृष्ण जीव,
कृष्ण ब्रह्मा,
कृष्णच माझे आराध्य आहेत….!
अर्जुन: अरे माधवा, कोणी आपल्याला जाणून न घेता आपल्याबद्दल वाईट मत का ठरवतात?
श्रीकृष्ण: अर्जुना, त्यांचा दृष्टीकोन हा निव्वळ त्यांच्या
अंतर्मनातील काळोखामुळे प्रतिबिंबित होत असतो,
परंतु त्यांच्या अश्या वागण्याने आपल्या सत्यावर काडी मात्र परिणाम होत नसतो.
श्री कृष्ण म्हणतात,
माणसास जीवनात कितीही अडचणी आल्या तरी
त्याच्या जीवनरूपी रथाचे सारथ्य माझ्याच हातामध्ये आहे,
आणि इतिहास साक्षी आहे की ज्याच्या जीवनाचे सारथ्य
मी करतो त्याचा विजय हा निश्चित असतो.
|| श्री स्वामी समर्थ ||
टीप – shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

श्री कृष्ण म्हणतात,
जेव्हा आपल्याला सत्य माहित असते,
तेव्हा खोट ऐकायला खूप मज्जा येते.
अर्जुन: अरे माधवा,
मी माझ्या आयुष्यातील चढ आणि उतारांना कसे सामोरे जायला हवे?
श्रीकृष्ण: अरे पार्थ,
जेव्हा तू येणाऱ्या फळाची आशेला स्वतः पासून वेगळे ठेवशील
आणि तुझ्या वागण्या बद्दल प्रामाणिक असशील तर ते नेहमी तुझ्या वाईट
काळामध्ये संरक्षण कवच म्हणून काम करेल.
आयुष्य सोपे होते, जेव्हा तुम्हाला समजते की,
जे भेटलं ती त्यांची(श्रीकृष्णाची) कृपा आणि
जे नाही भेटल ती त्यांची(श्रीकृष्णाची) मर्जी….
समजूतदारपणा म्हणजे, जेव्हा तुम्हाला कळते की,
जीवनातील काहीसे क्षण बिघडले म्हणजे संपूर्ण जीवन बिघडले असे नाही…!
पार्थ ही गोष्ट लक्ष देऊन ऐक की,
चंचल मनाला मनमानी नको करून देऊस.
त्याला थांबव!
आणि त्याला तुझ्यातील आत्मेचा सेवक बनव,
तुझ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीचा हाच उपचार आहे.
मनुष्य स्वतः चा मित्र पण आहे आणि शत्रू ही,
ज्याने आपला अहंकार, आपले मन व आपले इंद्रिये यांना आपल्या वश मध्ये केलंय
तो स्वतःचा मित्र आहे आणि जे ह्या सर्वांच्या वश मध्ये आहेत
ते स्वतः चे शत्रू!
ज्याला प्रत्येक दिशेमध्ये मध्ये,
प्रत्येक वस्तू मध्ये मीच दिसत असेल तो ते कधीच भटकू शकत नाही….
जो मला नाही विसरत मी ही त्याला नसतो विसरत पार्थ!
shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स
श्री कृष्ण म्हणतात,
जरी तुमचे सर्व काही पणाला लागले असेल,
परंतु अपमानाचा बदला हा शुल्लक वाटाघाटीने होता कामा नये.
नेहमी लक्षात ठेवा,
तुम्ही देवाचे कितीही मोठे भक्त असाल,
परंतु शेवटी जर तुम्ही अधर्माचा मार्ग निवडला तर तुमचा विनाश अटळ आहे…
|| राधे राधे ||
अर्जुन: हे श्रीकृष्णा,
मला नेहमी चिंता असते की,
माझ्या चुकीच्या निवडीमुळे मला नंतर पश्याताप होईल म्हणून?
श्रीकृष्ण: अरे पार्थ,
ज्याच्या मनात शंका, तो तर कार्य करण्याआधीच हरलाय.
स्वतः वर विश्वास म्हणजे विजय तुझाच.
जो सोबत राहून आपल्या सोबत छळ करत असेल
तर त्यापेक्षा मोठा शत्रू नाही,
आणि जो आपल्या तोंडावर आपले सर्व अवगुण सांगत असेल
त्या पेक्षा मोठा मित्र नाही…!
टीप – shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!

श्रीकृष्ण म्हणतात,
प्रत्येक परिस्थिती रुपी समस्येसाठी ३ उपाय असतात:
१. परिस्थितीचा स्वीकार करा.
२. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा.
३. सोडून द्या.
श्री कृष्ण म्हणतात,
विश्वास ठेव, मी तुला नक्की यशस्वी करेल.
तू फक्त एक पाऊलपुढे ये,
मी तुझ्यासाठी १०० पाऊल पुढे येईल.
वडील आणि सूर्य…
या दोघांचे तेज सहन करण्याची सवय करून घ्या
नाही तर संपूर्ण जीवन अंधारामध्ये व्यतीत करावा लागेल…!
श्रीकृष्ण म्हणतात,
आपल्या आतल्या राक्षसालाही कधी कधी बाहेर येऊ दिले पाहिजे.
कारण, देव बनून तुम्ही नेहमी आपल्या आत्मसन्मानास वाचवू शकत नाही.

हे साधका, पाप तुमचे शरीर नाही करत,
पाप करते ते म्हणजे तुमचे विचार…
आणि गंगा तुमच्या विचारांना नाही तर तुमच्या शरीराला धुत असते…!
मैत्री तर श्री कृष्ण आणि सुदामा सारखी पाहिजे,
एकाने काही मागितले नाही,
तर तर दुसऱ्याने सर्व देऊन मोठेपणा मिरविला नाही…!

टीप – shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
श्रीकृष्ण म्हणतात,
रागाचे रुपांतर पुण्यात तेव्हाच होते,
जेव्हा तो धर्म आणि मर्यादा साठी वापरला जातो
आणि सहनशीलताचे रुपांतर पाप मध्ये तेव्हाच होते,
जेव्हा ते धर्म आणि मर्यादा यांना वाचविण्यास असमर्थ ठरते.
श्री कृष्ण सांगतात,
कर्तव्य हा असा आदर्श आहे जो कधी धोका देत नाही,
व धैर्य हे असे कडू झाड आहे ज्यावर नेहमी गोड फळेच लागतात.
|| राधे राधे ||
आपल्या स्वतःच्या जीवनात आपण जर दुसऱ्यांच्या यशाचा चांगल्या मनाने स्वीकार केला नाही
तर त्याचे रुपांतर इर्षा मध्ये होते आणि जर स्वीकार केलाच तर ती आपल्या जीवनात प्रेरणा बनते…!
|| जय श्री कृष्ण ||
ज्या व्यक्तींना माहिती आहे की,
जे घडणार आहे, ते घडतेच आणि जे घडणार नाही ते कधीच घडत नाही.
अश्या व्यक्तींना कधीही कसलीच चिंता सतावत नाही.
|| जय श्रीकृष्ण ||

टीप – shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
श्रीकृष्ण म्हणतात,
नशिबाच्या दगडावर डोक आपटण्यापेक्षा,
तुम्ही मेहनतीच वादळ उत्पन्न करा.
यशाचे दरवाजे आपोआप तुमच्या साठी उघडले जातील.
|| राधे राधे ||
राधे राधे,
सर्वांना वाटते की सर्व दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न राहील,
परंतु हा केवळ एक भ्रम आहे, सत्यता ह्यात आहे की,
जे करायचं आहे ते प्रसन्न मनाने करा सर्व दुःख आपोआपच दूर होतील.
जय श्री कृष्ण
तुमची ताकद ही तुमच्या आवाजात नसून तुमच्या चांगल्या विचारात आहे
आणि चांगल्या कर्मात आहे,
कारण शेती ही पावसाच्या पाण्याने होते, पुराच्या पाण्याने नाही…!
हरे कृष्णा
आपण आपले कर्म निवडतो
आणि आपले कर्म त्याचे परिणाम…!

टीप – shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स आपण Copy button वर Click करून इतरांना share करू शकता. धन्यवाद!
जो आपला रागही सहन करून तुमच्या सोबत नेहमी राहून तुमची जर साथ देत असेल
तर त्या पेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कुणीही करू शकत नाही.
जय श्री कृष्ण
तुम्ही जीवनात काहीही करा,
पण एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की,
सत्याची साथ आहे तर ईश्वराची साथ आहे…!
|| जय श्रीकृष्ण ||
श्रीकृष्ण सांगतात,
जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात असेल,
परंतु तुम्हाला स्वतः वर विश्वास आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात,
तर अश्या परिस्थीत दुःखी होवू नका, असे समजा की,
मी किती भाग्यवान आहे की मी योग्य मार्गावर राहण्यासाठी मला संघर्ष करावा लागत आहे
त्यामुळे मी अधिक परिश्रम करून एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करेल.
shri krishna quotes in marathi | श्री कृष्ण विचार/कोट्स
अश्याच नवीन भक्तिमय देवी, देवता, साधू, संत, यांचे विचार आणि कोट्स वाचण्यासाठी Social Media वर share करण्यासाठी आपल्या लाडक्या Visualमराठी ह्या Website ला वेळो-वेळी आवर्जून भेट देत जा.
वाचाल तर वाचाल!
आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपली मातृभाषा मराठी ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या पर्यंत पोहोचविण्याचे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता व आपले उपयुक्त विचार आणि अडचणी असतील तर आम्हाला जरूर comment करून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टींचा नक्की विचार करून लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!
श्रीकृष्ण विचार/कोट्स सौजन्य – Facebook, Google, Instagram, Whatsapp आणि इतर.