mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५
(mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५)
खासकरून आपल्या भारतातील हिंदू संस्कृती प्रमाणे महाशिवरात्री हा एक मोठा सण मानला जातो आणि तेवढ्याच आनंदाने व उत्साहाने संपूर्ण जगा मध्ये साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यते प्रमाणे भगवान शिव आणि पार्वती यांच्या लग्न सोहळा तसेच भगवान शिव/शंकराच्या सन्मानार्थ हा संपूर्ण दिवस “महाशिवरात्री” म्हणून साजरा करतात. भगवान शंकराचे हिंदू धर्म मध्ये एक वेगळे आणि उच्च स्थान आहे. त्यांची आराधना व उपासना करणारा मोठा वर्ग भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आढळतो. महाशिवरात्री साजरी करताना अनेकजण संपूर्ण रात्र जागरण करतात, रात्रभर शिवाची आराधना, प्रार्थना, अभिषेक, पूजा करतात, असे मानतात की रात्रीच्या काळोखा नंतर आराधनेतून अज्ञानावर मात केली जाते. तसेच संपूर्ण दिवस उपवास देखील पाळला जातो. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी दुधामध्ये सुकामेवा, भंग, गुलाबजल, केशर या सर्वांचे मिश्रण एकजीव करून त्याचे प्रसाद (थंडाई) म्हणून सेवन केले जाते.
Visualमराठीच्या ह्या POST मध्ये आपणास mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५ उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की Share करा..
“कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणीचंद्र माथा मुकुट झळाळी| कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुजवीण शंभो मजकोण तारी| हर हर महादेव..!
महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!
ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही | तन्नो रुद्रः प्रचोदयात |महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
आध्यात्मिक आणि धैर्याने भरलेल्या, परिवर्तनकारी महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा…हर हर महादेव!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
महादेवाच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
भगवान शिवाचे वैभव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जावो…!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
भोलेनाथ तुमच्यावर आणि तुमच्यावर व परिवारावर प्रेमाचा नेहमी वर्षाव करोत. ओम नमः शिवाय!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शिवरात्री साजरी करूया, आपण भगवान शंकराच्या शाश्वत शिकवणींचे स्मरण करूया आणि त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५)
भगवान शंकरास हिंदू संस्कृतीमध्ये आदी देवाचे स्थान आहे. संपूर्ण भारतामध्ये त्यांचे आराधना, पूजा स्थान आढळतात. त्यातील १२ जोतिर्लिंग या तीर्थक्षेत्रास अनन्य साधारण महत्व आहे. संपूर्ण वर्ष आणि खास करून महाशिवरात्री च्या प्रसंगी करोडो भाविक अगदी मनोभावे भोलेनाथ/आदिदेव/नीलकंठ/शंकराचे दर्शन घेतात आणि व्रत, उपवास द्वारे आराधना करतात. महाराष्ट्रामध्ये ही ५ जोतिर्लिंग आहेत जसे की भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजिनाथ. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सामग्री मध्ये खास करून बेल पत्र, दुध अभिषेक यांचा आवर्जून वापर केला जातो.ओम त्र्यंबक यजामहे सुगन्धिं पुष्ठी वर्धनम | उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय ||
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
बेलाचे पान वाहतो माझ्या महादेवाला,
करतो वंदन माझ्या भोलेनाथाला,
सदैव तुझी कृपादृष्टी मिळो,
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
भोलेनाथ शिव शंकर यांची अनंत कृपा आपल्यावर नेहमी अशीच राहो!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेव आपली सर्व संकटातून आणि दुखः मधून सुटका करोत हीच मनापासून इच्छा! हर हर महादेव |
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान शिवशंकर तुम्हाला यशस्वी बनवोत आणि सर्व दुखः चे निवारण करोत! ओम नमः शिवाय| महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या वर आणि आणि आपल्या परिवारावर भोलेनाथ शंकर यांचा आशीर्वाद असाच नेहमी राहो ह्या सदिच्छा! महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
(mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५)
|| श्री शंकराची आरती ||
लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा ।
वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥
कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥
देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें ।
त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें ।
नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें ॥३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥
व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अन्तरी ॥४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥
VisualMarathi वरील (mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५)शुभेच्छा share नक्की करा.
महादेव तुम्हाला आणि तुमच्या सर्वा परिवारास योग्य सद्बुद्धी देवून दिव्यत्वाकडे वाटचालीस नेहमी बळ देवो. हर हर महादेव | महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा!
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती. शिव म्हणजे एक, शिव म्हणजे अनेक.
शिव म्हणजे आदी, शिव म्हणजे अनंत! ओम नमः शिवाय |
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
कैलासवासी भोलेनाथाच्या कृपेने तुमचे जीवन समृद्ध होवो! महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
भोलेनाथ तुम्हास सुख, शांती, समृद्धी आणि यश देवो! महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
महाशिवरात्रीच्या पावन दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास महाशिवरात्रीच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
शिकवितो जो जगण्याचा सार, तोच तू आमुचा एकमेव आधार, तू शिकवितो आम्ही कसा करावा भव्य सागर पार..हर हर महादेव… महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

नको ती दिव्यदृष्टी, नको ती निर्जीव श्रुष्टी, फक्त असावी सर्वांवर आपल्या महादेवाची कृपादृष्टी!
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
ज्याच्या मनी शिव विचार तो नसे कधी लाचार, ज्याच्या अंगी शिव भक्ती, त्याच्या मागे सदैव महादेवाची शक्ती… महाशिवरात्रीच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा!!!
योगी तुम्ही, काळ तुम्ही
महाकाल तुम्ही, भूतेश्वर तुम्ही
सर्व जग तुम्ही, सर्वांचे स्वामी तुम्ही
तुम्ही शिव तूम्हीच सत्य! महाशिवरात्रीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!
फक्त एक फूल गोकर्णाचे
एक पान बेलाचे
एक पात्र जल भरुन
आणि प्रभू भगवान शिव सर्वस्व तुमचे… हर हर महादेव…महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
हे शंभो शंकरा, तू माझ्या पाठीशी असलास तर दु:ख नाही, तू माझ्यासोबत असेल तर प्रत्येक लढाई जिंकली जाईल. महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा…!
श्री शिवाय नम:
श्री शंकराय नम:
श्री महेश्वराय नम:
श्री सांबसदाशिवाय नम:
श्री रुद्राय नम:
ॐ पार्वतीपतये नम:
ॐ नमो नीलकण्ठाय नम:.!
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।।
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
सर्व मंगल मांग्लयै शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||
सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!!!
भीती मला आता कश्याची जेव्हा भोलेनाथ उभा माझ्या पाठीशी!
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
भगवान शंकर तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करून सद्गुणांच्या तुमच्यावर वर्षाव करो हीच सदिच्छा!
महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!!!
रवींदु दावानल पूर्ण भाळी ।
स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
हा महाशिवरात्रीचा दिवस तुमच्या संपूर्ण जीवनाला नवी शक्ती, उन्नती आणि भरभराटी देवो!
महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!!
महाशिवरात्री निमित्त महादेवांच्या चरणी अशीच प्रार्थना करा की आपले सर्व दुखः निवारण होवोत!
महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!
शिवशंकर आपणा सर्वांना सद्बुद्धी आणि नेहमी सत्कर्म करण्याची शक्ती आणि संधी देवोत!
महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!!!
टिप – खालील दिलेल्या सर्व शुभेच्छा mahashivratri wishes in marathi 2025 | महाशिवरात्री शुभेच्छा २०२५आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ह्या महाशिवरात्रीच्या शुभ संधीनिमित्त महादेव चरणी शतशः वंदन!
ओम नमो पार्वती पते हर हर महादेव |
महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हळाहळें कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
ह्या महाशिवरात्रीच्या शुभ संधीनिमित्त श्री दत्त चरणी शतशः वंदन!
महादेवाचे करुया ध्यान
वंदू चरण प्रेमभावे. हर हर महादेव
महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
अश्याच महाशिवरात्रीच्या महत्वाच्या सणासाठीच्या शुभेच्छा संदेशसाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट द्या. आम्ही नेहमी तुमच्यासाठी मराठी भाषेतील नव-नवीन Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle