marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे
“घे ग आता नाव!”
(marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे) हे शब्द कानावर पडताच सगळ्यांची मने आणि डोळे मुख्य नावघेणाऱ्या व्यक्तीकडे आपसूकच वळतात. कारण सर्वांनाच उत्सुकता असते, नाव घेणाऱ्या व्यक्तीच्या शब्द रचनेची आणि त्यांतून तिच्या साथीदार बद्दलच्या प्रकट होणाऱ्या भावनांची. मग सुरु होतो गमतीशीर मुद्दाम नाही-नाही म्हणत नाव घेण्याची सुरुवात. आपल्या मराठी संस्कृती नुसार आपल्याकडे नाव घेण्यासाठी निमित्त तर फार आहेत आणि नसलेच तरी जेष्ठांच्या आग्रहास्तव आपला पण कधी नाविलाज होतो. त्यामुळे आपल्या स्वभावाला आणि आपला साथीदाराला साजेसे ५-६ उखाणे आपल्याला तोंडपाठ हवीच. जेणेकरून आपण सर्वांच्या उत्सुकतेवर विनाकारण पाणी नाही फेरले जाणार.ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणेउपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.टिप – खालील दिलेल्या सर्व (marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे)उखाण्यांमध्ये _____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला, ____ चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला!
केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्रांची, केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्रांची, ___ रावांच नाव घेते आता सून झाले ___ घराण्याची!
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
____ च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते…!
एकत्रित बघितले स्वप्न, आज प्रत्यक्षात साकार झाले, अन ____ रावांचे नाव घेताना मन आनंदाने भरून आले!
कमळावरती उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती, कमळावरती उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती, ____ रावांचे नाव घेते खरी मी भाग्यवती!
दारात काढली रांगोळी, रांगोळीला काढली लक्ष्मीची पावलं, ___ रावांच साध भोळ रूप माझ्या मनाला भावलं!
पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट, पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट, अन ___ रावंसोबत बांधते आयुष्यभराची गाठ!
इंद्रधनुष्य दिसते जेव्हा पावसात असते ऊन, इंद्रधनुष्य दिसते जेव्हा पावसात असते ऊन, अन ____ रावांशी लग्न करून झाले ___ घराण्याची सून…!
टिप – खालील दिलेल्या सर्व (marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे)उखाण्यांमध्ये _____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आपण जर नवीन उखाणे
(Marathi ukhane for female 2024 | नववधू साठीचे खास नवीन उखाणे 2024)
शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. आपली महाराष्ट्राची आणि भारतीय संस्कृती व तिची विविध वैशिष्ठे आपल्या जीवनात छोट्या छोट्या कृतीमधून आनंद शोधण्याचा आणि निर्माण करण्याचा उत्साह देत असते. त्यापैकीच एक म्हणजे उखाणे घेण्याची प्रथा. ही एकच अशी प्रथा आहे जी की, तरुण मंडळी अगदी आवडीने follow करते. चला तर मग नववधू साठीचे खास नवीन उखाणे बघुयात.
अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, ___ रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर!
हळद लावूनी अंगाला, हातावर सुबक मेहेंदी मी रेखाटली, अन ____ रावासोबत उभ्या आयुष्याची रेशीमगाठ मी बांधली!
तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला करते नवस, तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला करते नवस, ___ रावांचे नाव घेते आज आनंदाचा दिवस!
नव्या आयुष्याची सुरुवात करताना हात देते हाती, नव्या आयुष्याची सुरुवात करताना हात देते हाती, अन ___ रावांच्या साथीने बहरून येतील नवी नाती!
कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला, नऊवारी शिवाय नाही साज, अन ____ रावांच नाव घेते, त्यांना नजर ना लागो कोणाची आज!
अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा, अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा, ___ रावांच्या नावावर भरते लग्नचुडा!
मावळता सूर्य चंद्र उगवला आकाशी, मावळता सूर्य चंद्र उगवला आकाशी, ____ रावांचे नाव घेते या मंगल कार्याच्या दिवशी!
एक मनाची सांगड, सुखी संसाराचे सूत्र, एक मनाची सांगड, सुखी संसाराचे सूत्र, ___ रावांनी घातले माझ्या आज गळ्यात मंगळसूत्र !
टिप – खालील दिलेल्या सर्व (marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे)उखाण्यांमध्ये _____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, ____च नाव तुम्हाला माहितीये तरी मला विचारता कश्याला!
____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ____ सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, ___ माझा हिरो अन मी त्याची हिरोईन!
लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व, लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व, _____ रावांचे नाव घेते, ऐकत आहे न सर्व?
स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते, स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते,
_______ रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.
माहेरचे संस्कार अन् सासरचे वातावरण, माहेरचे संस्कार अन् सासरचे वातावरण,
____च्या संसाराचे करीन मी नंदनवन.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, गुलाबाचे फुल दिसायला ताजे, ____ रावांचे नावं घेते सौभाग्य माझे!
तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता ____ च्या प्रेमात पडली माझी विकेट!
गळ्यात मंगसुत्र, मंगलसूत्रात डोरलं, गळ्यात मंगसुत्र, मंगलसूत्रात डोरलं, ___ रावांच नाव माझ्या हृदयात कोरलं!
टिप – खालील दिलेल्या सर्व (marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे)उखाण्यांमध्ये _____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

ह्या POST (Marathi ukhane for female 2024 | नववधू साठीचे खास नवीन उखाणे 2024) आम्ही खासकरून नवीन नवरी साठी च्या उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. जेणेकरून आपले विचार, संस्कार, कल्पकता नवीन नाते असल्यामुळे अधिक खुलून निघेल. लग्न समारंभ म्हणेज सर्व नातेवाईक तसेच आप्तेष्टांच्या संमतीने होणारे दोन मनांचे मिलन, तेव्हा सर्वांच्या नजर नव्या जोडीच्या प्रत्येक हालचालीवर असते. तेव्हा जर तुम्ही चांगला उखाणा घेतला तर सर्वांचा मनावर एक सुंदर छाप निर्माण होवून आपल्याला एक सुंदर आठवणही राहते.
निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान, निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान, ____ चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान!
भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवदगीता, भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवदगीता, ___ रावांच नाव घेते तुमच्या सर्वांच्या करिता!
आशीर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा, आशीर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,____ रावांचा व माझा संसार आहे सुखाचा!
मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, ___ रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा!
मंगलसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, मंगलसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, ___ यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
सनई आणि चौघडे वाजे सप्तसुरात, सनई आणि चौघडे वाजे सप्तसुरात, ___ रावांचे नाव घेते, ___ च्या घरात!
हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी, हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी,___ रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी!
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, __ मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे!
टिप – खालील दिलेल्या सर्व (marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे)उखाण्यांमध्ये _____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
नेहमी आपल्या आवडीचे आन्ही स्वभावाला साजेसे २-३ मराठी उखाणे (Marathi ukhane for female 2024 | नववधू साठीचे खास नवीन उखाणे 2024) तोंडपाठच असले पाहिजे, कारण लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरही किमान १ वर्ष कोण कधी “नाव घे” म्हणेल याच्या काही नेम नाही. त्यामुळे आपल्याला जर अजून दर्जेदार उखाणे हवे असतील तर नक्कीच आमच्या इतर मराठी उखाणे POST/Page वर जाऊन हवे तसे उखाणे आपण शोधू शकता. आपल्याला Visualमराठीचा हा उपक्रम आवडला असेल तर आम्हाला जरूर कळवा.
तेलाच्या दिव्याला तुपाची वात, तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ____रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात!
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी, संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी, ____ च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी!
दुधाचा केला चहा, चहाबरोबत होती खारी, दुधाचा केला चहा, चहाबरोबत होती खारी, ___राव हे जगात लयभारी!
चौरंगावर कलश कलशावर संध्यापात्र, संध्यापत्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास, बालकृष्ण ला वाहिले तुळशीचे पान, ___ रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान!
सनई वाजली, मंडप सजला, केली फुलांची सुंदर आरास, सनई वाजली, मंडप सजला, केली फुलांची सुंदर आरास, ___ रावांच नाव घेते आजच्या दिवशी खास!
आई अंबाबाई ही जगाची स्वामिनी, आई अंबाबाई ही जगाची स्वामिनी, ___ रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी!
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची, दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची, ___च नाव घेते, सून मी ___ ची.
न सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख समाधानाची इच्छा, माझ्या अन ____ च्या संसाराला असाव्यात तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा…!
टिप – खालील दिलेल्या सर्व (marathi ukhane for female | नववधू साठीचे खास नवीन उखाणे)उखाण्यांमध्ये _____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदारचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी या website Portal वर आपल्याला विविध सणासाठीचे वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच मराठी उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत मराठी भाषेतील दर्जेदार Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी महाराष्ट्रातील नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत आमचे खूप मुडी!
नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे, नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे, ____ रावांसारखे पती सात जन्म मिळावे…!
शिवरायांच्या माथ्यावर, भवानी मातेचा हात, शिवरायांच्या माथ्यावर, भवानी मातेचा हात, ____ रावांची अशीच असुदे, जन्मभर साथ!
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ___चे नाव घेते ____ च्या दिवशी!
न सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख समाधानाची इच्छा, माझ्या अन ____ च्या संसाराला असाव्यात तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा…!
नेत्राच्या निरांजनात प्रीतीची लावते वात, नेत्राच्या निरांजनात प्रीतीची लावते वात, ___ च्या बरोबर करते सुखी संसाराची सुरुवात..!
नव्हत्या माहित मला, जन्मांतरीच्या गाठी, नव्हत्या माहित मला, जन्मांतरीच्या गाठी, देवाने बनवलंय ____ तुला माझ्या साठी…!
आई बाबा आहेत माझे सर्व प्रथम गुरु, आई बाबा आहेत माझे सर्व प्रथम गुरु,__ रावांसोबत आजपासून संसाराचा प्रवास सुरु…!
अश्याच नवनवीन नववधूसाठीच्या उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठीस नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या पर्यंत मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
नववधू उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.
Table of Contents
Toggle