mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४
(mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४)
“नाच ग घुमा, कशी मी नाचू…!”
ह्या मराठी गाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर येतो मराठी संस्कृतीतील महिलांसाठीचा सामुहीत सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर ही श्रावण या मराठी महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आयोजीत केली जाते आणि आपल्या सर्वाना माहितीचा असेल की अनेक महिला पारंपारिक वस्त्र घालून, वेगवेगळे मैदानी, बैठे, शाब्दिक खेळ खेळतात. ह्या पारंपारिक सणामध्ये अजून रंगत आणतात ते म्हणजे (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४) मंगळागौर उखाणे.
नवीन लग्न झाल्यावर खासकरून पहिल्या वर्षी अनेक विधी असतात. अनेक वेगळेपणाने सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर नवदाम्पत्यांसाठी अनेकविध पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीसाठीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा मराठी महिन्यातील श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण म्हणून ओळखला जातो. नवविवाहित, मैत्रिणी आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण एकत्रितपणे साजरा करतात आणि पूजा झाल्यावर रात्री जागरणही करण्यात येते.
Visualमराठीच्या या POST मध्ये आपल्याला mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते नक्की वाचावे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत जरूर share करायला विसरू नये.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी (२), ___ रावांचे नाव घेते मंगळागौरच्या हळदी कुंकवाच्या दिवशी!
चौरंगावर कलश कलशावर संध्यापात्र संध्यापत्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पण ____ रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान!
हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, ____ रावांचे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी!
पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी, पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी, ___ रावांचे नाव घेते मंगळागौर च्या दिवशी!
कमळावरती उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती, कमळावरती उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती, ____ रावांचे नाव घेते खरी मी भाग्यवती!
वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीची काया, वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीची काया, ___ रावांचे नाव घेऊन पडते ____च्या पाया!
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!
चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, ___ चं नाव घेते पहिला नंबर माझा!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

आपण जर मंगळागौर उखाणे
(mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४)
शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. या दिवशी सर्व प्रथम मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेकविधी गाणी म्हणत अनेक खेळ खेळण्यात येतात. यामध्ये फू बाई फू, लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं, झिम्मा अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते. आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करून सर्व महिला खेळाची मजा लुटतात.त्यापैकीच एक मज्जा म्हणजे उखाणे घेण्याची प्रथा.
संसार रुपी करंजीत प्रेमरूपी सारण, संसार रुपी करंजीत प्रेमरूपी सारण, ___ रावांचे नाव घेते मंगळागौरचे कारण!
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, ___ रावांचे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी…!
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ___चे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी!
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ____ रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते.
कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मीच्या गळ्यात, कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मीच्या गळ्यात, ___चं नाव घेते सुवासिनीच्या मेळाव्यात.
नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे, नाजूक अनारसे, साजूक तुपात तळावे, ____ रावांसारखे पती सात जन्म मिळावे…!
इंद्रधनुष्य दिसते श्रावणात जेव्हा असते ऊन, इंद्रधनुष्य दिसते श्रावणात जेव्हा असते ऊन,___ रावांचे नाव घेते मी ____ घराची सून..!
श्रावणात/मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर, श्रावणात/मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर,____ रावचे नाव घेते भाग्य माझे थोर…!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

मंगळागौर साजरी करतांना यामध्ये झिम्मा आणि फुगडी हा खेळाचा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. आपल्या संस्कृतीचे निरीक्षण केल्यास समजते की प्रत्येक गोष्टीसाठी अथवा कृती साठी काही तरी विज्ञान पूरक असा विचार किवा अध्यात्मिक विचार जरूर जोडलेला आढळतो. त्यामुळेच या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांचा सर्वांगीण व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात व्यस्त असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींशी खेळण्याच आनंद घेता यायचा. खेळाचा आनंद महिला गाणी गुणगुणत घेत असत. मंगळागौरीचे हे खेळ कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे तस्रच बौद्धिक क्षमतेला वाव देणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे. मंगलागौरी च्या काही महत्वाच्या खेळाची नवे म्हटले की लगेच आठवते की, बस फुगडी, झिम्मा, आगोटापागोटा, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, सासू – सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी जे वारंवार खेळले जातात. यामध्ये सर्वांचा आवडतीचा भाग म्हणजे उखाण्यांची (mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४) होणारी देवाणघेवाण.
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, मंगळागौरीच्या दिवशी नाव घेती मी ____ ची सौभाग्यवती!
श्रीकृष्णा मुळे घडली गेली भगवदगीता, श्रीकृष्णा मुळे घडली गेली भगवदगीता, ____ माझे राम तर मी त्यांची सीता…!
भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ, भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ, _____ रावाशिवाय माझे जीवन व्यर्थ.!!!
श्रावणाच्या पावसात सोडली कागदाची होडी, श्रावणाच्या पावसात सोडली कागदाची होडी, ____ रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी…!
चिमुकल्या ओढ्याच झाली विशाल नदी, चिमुकल्या ओढ्याच झाली विशाल नदी, ____ च्या बरोबर केली मी सप्तपदी…!
संतांच्या अभंगात आहे ‘अमृतवाणी’, संतांच्या अभंगात आहे ‘अमृतवाणी’, ___ माझ्या साठी म्हणतात मधुर गाणी…!
प्रथम भेट ती नजरांची, दोन ध्रुवांच्या मीलनाची, प्रथम भेट ती नजरांची, दोन ध्रुवांच्या मीलनाची, ____ मुळे धुंध झाले, अंतरी फुले फुलली प्रीतीची..!
महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ, महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ, ____राव मी माझे प्रेम असेच राहू दे अतूट!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, ____ चं नाव घ्यायला मला नाही आळस.
जीवनाच्या प्रांगणात सुख दुःखाचा खेळ अविनाशी, जीवनाच्या प्रांगणात सुख दुःखाचा खेळ अविनाशी, ____ चा उत्कर्ष हो राहो हेच मागणे देवापाशी.
सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न, सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न, _____ रावांच्या सोबत झाले माझे लग्न.
मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, ___ रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा!
संसाराच्या सारीपटावर पडले सौभाग्याचे पान, संसाराच्या सारीपटावर पडले सौभाग्याचे पान, _____ रावांचा राहो चोहीकडे मान.
साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल, साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल, सखींनो ___ रावांच्या संगतीन संसार करीन सफल.
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या रेशीमगाठी, दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या रेशीमगाठी, ____ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी…!
पाच बोटातून होते कलेची निर्मिती, पाच बोटातून होते कलेची निर्मिती, ___रावांची व माझी जडली प्रीती…!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.

(mangalagaur ukhane in marathi | मंगळागौर साठीचे खास उखाणे २०२४)
मोठा उखाणा
बसले होते घरात पाहत होते आरश्यात, माझ्यावर होते सासरी सुखाची बरसात जशी दुधावर असते मऊ साय, सासू माझी आहे दुसरी माय!
कधीच नाही दाखवत मला धाक, सासरे म्हणजे माझे दुसरे बाप!
प्रेमाने घालते मला खाऊ ___ आहे माझी जाऊ. नेहमीच पाठीशी असतात खंबीर ___ आहेत माझे दीर.
जी देते बहिणीची माया आणि आनंद ___ आहे माझी नणंद!
कधीच जात नाही मी बावरून कारण पतीदेव घेतात मला सावरून.
_____ रावांच्या नावाची लावते मी चंद्रकोर ___ सारखे सासर मिळाले भाग्य माझे थोर!
एक तीळ सात जण खाई, एक तीळ सात जण खाई, ____रावांना जन्म देणारी धन्य ती आई.
संतांच्या वाणीत आहे ज्ञानाच्या खाणी, संतांच्या वाणीत आहे ज्ञानाच्या खाणी, ____ राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळत राहो एकनिष्ठ प्रेम, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळत राहो एकनिष्ठ प्रेम, ____ रावांची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
महाराष्ट्रातील संत परंपरेच्या प्रतीभेने डोळे दिपले जगाचे, महाराष्ट्रातील संत परंपरेच्या प्रतीभेने डोळे दिपले जगाचे, ___ सह संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
गोऱ्या-गोऱ्या हातावर रेखाटली सुबक मेहंदी, गोऱ्या-गोऱ्या हातावर रेखाटली सुबक मेहंदी,___रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी…!
अंतरीचे गीत उमटले, शतजन्मीचे नाते जुळले, अंतरीचे गीत उमटले, शतजन्मीचे नाते जुळले, ____ रावांसह अंतरी प्रितीचे फुल उमलले.
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले, संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले, प्रत्यक्षात ____ रावांची जीवनसाथी मी झाले.
नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी, नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी, तुमच्या आशीर्वादाने बाग फुलविते ____ च्या अंगणी.
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ____ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी ह्या website/WebPortal वर आपल्याला विविध उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असतो की आपल्या पर्यंत दर्जेदार मराठमोळ Content पुरवावे. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत राहू.
सौभाग्याचे काळे मनी घातले गळा, सौभाग्याचे काळे मनी घातले गळा, ____ रावांच्या नावाने लाविते कपाळी लाल टिळा.
उखाणा घेऊन भागीनिंच्या साप्तगुनांना मिळतो वाव, उखाणा घेऊन भागीनिंच्या साप्तगुनांना मिळतो वाव, आज आहे मंगळागौरी _____रावांचे घेते मी नाव.
दैनंदिन जीवनात सुद्धा भगवत गीतेला आहे महत्व, दैनंदिन जीवनात सुद्धा भगवत गीतेला आहे महत्व, ___ रावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्व.
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ___चे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी!
विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची, विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची, ___ रावांचे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची.
वर्षाकाठाचे महिने बारा, वर्षाकाठाचे महिने बारा, ___ या नावात सामावलंय आनंद सारा.
कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिक पणाची जोड, कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिक पणाची जोड, ____रावांचे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.
मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती, मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती, ___रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती.
अश्याच मंगळागौर उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील New Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
मंगळागौर उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.
Table of Contents
Toggle