rangapanchami wishes in marathi 2025 | रंगपंचमीच्या शुभेच्छा २०२५ धुलिवंदन/धुळवड सणानिमित्त शुभेच्छा संदेश जर आपण शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. रंगपंचमी हा सण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अगदी आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. ह्या दिवशी सर्वजण सप्तरंग एकमेकांचा अंगाला लावतात. हा सण फाल्गुन ह्या मराठी महिन्यातसाजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण वेगवेगळ्या दिवशी पण साजरा केला जातो जसे की कोकणात वेगवेगळ्या गावी रंगपंचमी वेगवेगळ्या दिवशी साजरी करतात. तसेच इतर ठिकाणी पुणे, नाशिक येथे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा होतो. उत्तर भारतामध्ये रंगपंचमी होलिकोत्सव च्या दुसऱ्यादिवशी साजरी करतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही अनेक जिल्ह्यामध्ये रंगपंचमी होळीच्या दुसऱ्यादिवशी साजरी करतात.
Visualमराठी नेहमी आपल्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन सण, उत्सव, समारंभ साठीच्या मराठी मध्ये शुभेच्छा rangapanchami wishes in marathi 2025 | रंगपंचमीच्या शुभेच्छा २०२५ घेऊन येते. आपण जरूर वाचावे आणि आपला जवळच्या नातेवाईकांसोबत जरूर Share करावे. धन्यवाद!
समृद्धीचा रंग आपल्या आयुष्यात भरो,
यशाचा टीळा आपल्या कपाळी लागो…!!!
सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वतःचा विसरुनी, एकीचे महत्व सांगतात…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात सदैव येत राहो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
आपणास व आपल्या परिवारास रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भिजू दे रंग अन अंग तुझे स्वच्छंद,
अखंड उठू दे मनी हर्ष रंग तरंग,
व्हावे अवघे जीवन दंग-दंग,
असे उधळूया आज हे रंग…!
रंगपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
एक रंग मैत्रीचा,
एक रंग आनंदाचा,
सण आला उत्सवाचा,
साजरा करूया चला सण रंगाचा…!
रंगपंचमीच्या शुभेच्छा…!
रंगपंचमीचा सण रंगांचा,
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा,
वर्षाव करी आनंदाचा…!
रंगपंचमी निमित्त सर्वांना रंगमय शुभेच्छा.!!!
नारंगी रंग पळसाच्या फुलांचा,
हिरवा, गुलाबी गुलालाचा,
पिचाकरीत भरून सारे रंग,
होवुया आनंदात दंग,
भिजवूया सर्वांचे अंग-अंग….
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
सप्तरंगांची उधळण,
धवल कांती नील गगन,
त्यात आपुलकीचा ओलावा,
अखंड राहो नात्यांचा गोडवा….!
रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!

भिजू दे अंग आणि मन स्वच्छंद,
अखंड उडू दे मनी रंगतरंग,
आज सारखे व्हावे अवघे जीवन दंग,
असे उधळू आपण सर्व आज हे रंग…!
हैप्पी रंगपंचमी…!
रंग चैतन्याचा,
रंग नाविन्याचा,
रंग समृद्धीचा,
रंग यशाचा,
होळीच्या रंगात रंगून जावो तुमच्या सर्वांचे जीवन आनंदून….!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगात रंग मिसळले की आणखी छटा निर्माण होतात,
माणसांनी माणसास भिडलं की छान नाती तयार होतात,
चला रंग आणि नाती अधिक काळ टिकवण्यासाठी रंगपंचमी साजरी करूया…!
रंगपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!!!
मी कृष्ण,
तू राधा,
प्रीतीचा हा रंग,
बहरू दे सदा….
रंगपंचमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

रंग न जाणती जात नी भाषा,
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन नांत्यांनी भरलेले तळे,
भिजुनी फुलावूया प्रेम रंगांचे मळे…!
रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात भेटलेला प्रत्येक जण रंगपंचमी सारखाच होता,
काही रंग बदलत गेले, काही रंग भरत गेले…!
रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
रंगाची उधळण करून जगवूया आशा,
रंगून टाकू चारी दिशा,
मनी रंग उमलू दे विश्वासाचा,
सण साजरा करूया वसंतोत्सवाचा…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
भावना घेऊन रूप रंगांचे,
मुखावर दिमाखात मिरवती,
चिंब होऊन अंतरंग सुखाने,
चैतन्याच्या सरी बरसती…!
रंगपंचमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Recent Posts
रंग होऊन हर्ष भावना चेहऱ्यावर आली लाली,
रंगपंचमीच्या सणाला साऱ्यांची चर्या खुलून गेली!!!
रंगपंचमी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…!
ह्या रंगपंचमीला रंग असो वा जीव जपून लावा,
कारण सण आणि क्षण गेले तरी डाग मात्र स्मरणात राहतात…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंग निराळे घेऊन हाती,
सोहळे आनंदाचे रंगवू, रंग वापरून निसर्गाचे,
सण हा साजरा करू…!
सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
रंगपंचमीचा सण हा आला,
रंग सारे आज खेळूया चला,
सप्तरंगांची उधळण करुनी,
संस्कृती आपली जपूया चला…!
रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
रंगापासून नाही तर नेहमी रंग बदलणाऱ्या पासून सावध रहा…!
रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
सप्तरंगाच्या छटा उधळूनी,
आसमंत सारा उजळूया,
रोजच्या विटक्या क्षणात,
चला आनंद भरवूया…!
सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा!

वसंताच्या आगमनासाठी वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून नवी पालवी मिरवीत आहेत,
रंगांची उधळण करीत चहुबाजूने निसर्ग आनंद साजरा करीत आहेत…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग… ज्यामुळे हे आयुष्य सुंदर आहे…
पाणी.. ज्यामुळे हे आयुष्य आहे…
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे नैसर्गिक रंग वापरा…
कमीत कमी पाणी वापरून, कोरडे रंग वापरा…
जेणेकरून रंग खेळाचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल…!
होळीच्या रंगमय शुभेच्छा!!!
रंगांचे खेळ सारे एकतेने खेळूया,
धर्म पंथ जात यांना रंगांनी लपवूया…
लपतील रंगांनी जेव्हा हे धर्म सारे,
तेव्हाच वाहतील प्रगतीचे आनंद्वारे…
रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गालावरती तुझ्या रंग रंगपंचमीचा बहरू दे,
असेच हास्य सदा तुझ्या चेहऱ्यावर झळकू दे…
होळीच्या ज्वालांनी अंधकार संपू दे,
यशाची, उत्साहाची लाट सर्वत्र पसरू दे…!
रंगपंचमीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा!!!
गांजलेल्या नात्यात नवे रंग भरुया,
उधळण होईल मग हर्षाची,
सप्तरंगाचे इंद्रधनू उमटून,
फुले बहरतील नव्या आकांक्षेची …!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगपंचमीचे सारे रंग,
कसे माझ्यावर भाळले…
प्रेमाचे रंग गुलाबी,
जेव्हा तुझ्या गालावरती अवतरले…
रंगपंचमीच्या शुभेच्छा!!!
Recent Posts

पिचकारीचे पाणी आणि रंगांची गाणी,
रंगपंचमीच्या सणाची,
अशी वेगळी कहाणी…
वेग-वेगळ्या रंगांनी रंगलेला हा सोहळा,
लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा…!
रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
रंगात रंगले मन…
हर्षात फुलले जीवन…
रंगपंचमीच्या रंगाची रंगली अशी काही शिंपण,
हृदयी उरले प्रेम, अन मनात गोड नात्यांची नवी गुंफण…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
|| रंगबंध ||
थंड रंगस्पर्श, मनी नवहर्ष…
अखंड रंगबंध, जगी सर्वधुंद….
रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
रंगून जाऊ रंगात आता होऊ दे स्वैर स्वच्छंद…
तोडून सारे बंध आज उधळू आनंद…
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
जीवनाच्या वाटेवर,
पुन्हा मागे वळून पाहू,
सोडून गेल्या क्षणांना,
आठवणीत जपून ठेवू…
उरले सुरले क्षण जेवढे,
आनंदाने जगत जाऊ,
रंगात रंगून रंगपंचमीच्या,
हर्ष उधळत राहू…!
रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
भेदभाव विसरून येथे,
एकतेचे दर्शन होते,
उत्सवप्रिय देशात आमुच्या,
रंगातूनही हास्य उमलते…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

रंगपंचमी आनंदाची,
चहूकडे उधळण करी,
सप्तरंगी रंगुनी जाता,
नवी उमेद फुलती उरी…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
रंगात भिजुनी चिंब आता,
रंगाचेही गाणे होते,
सच्चेपणा रंगाचा पाहता,
उत्साहाला उधाण येते…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगपंचमी निसर्गाची,
जन्मोजन्मी संगे नाते,
जीवनाचे रंग अनोखे,
उत्सवात त्या मिसळून जाते…!
सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतू फुलला,
आज साजनीच्या मनी,
रंगांची उधळण तिच्यावर,
सजनाच्या अंगणी…
प्रीतीची वेळ फुलली,
गातो आम्ही गाणी…
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
खुलून येवो तुमच्या जीवनाचा प्रत्येक रंग,
रंगपंचमीच्या रंगांनी बहरून द्या तुमचे अंतरंग…!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंगात रंगुनी जाऊ,
सुखात चिंब न्हाऊ,
जीवनात राहू दे रंग,
सौख्याचे अक्षय तरंग…!
सर्वांना रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा!
Recent Posts

rangapanchami wishes in marathi 2025 | रंगपंचमीच्या शुभेच्छा २०२५
अश्याच रंगमय आणि मजेदार मराठी सण संबंधित शुभेच्छा वाचण्यासाठी आणि इतर Social App ठिकाणी share करण्यासाठी आपल्या हक्काच्या Visualमराठी ह्या Website भेट देत जा.वाचाल तर वाचाल! आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मराठी मातृभाषा ही किती समृद्ध आहे. त्यामुळे मराठीतील इंटरनेट Content आपल्या समोर लवकर सादर करण्याचे आम्ही कर्तव्य समजतो. आपणंही आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होवून आपले सल्ले, विचार आणि अडचणी आम्हाला जरूर comment करून कळवू शकता. आम्ही आपल्या सर्व सूचनांचा नक्की विचार करू व लवकरात लवकर गोष्टी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू.(rangapanchami wishes in marathi 2025 | रंगपंचमीच्या शुभेच्छा २०२५)मराठी मध्ये बोलूया, मराठी मध्ये share करूया. धन्यवाद!Table of Contents
Toggle