sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५
Visualमराठी
हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षातील महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे “मकर संक्रांती”(sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५) आपण जर संक्रांती मराठी उखाणे शोधात असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. मकर संक्रांतीचे सामाजिक, भौगोलिक दृष्ट्या खूप महत्व आहे. भारतातील इतर अनेक राज्यांमध्येही हा सण वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या रुपामध्ये साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये या सणाचे जास्त महत्व जरी असले तरी प्रामुख्याने महिलांसाठी ह्याचे एक वेगळेच आकर्षण असते. संपूर्ण महिला ह्या सणासाठी नवीन वस्त्र, अलंकार (बांगड्या, हलव्याचे दागिने, साड्या इतर समान) आवर्जून खरेदी करतात. त्यांच्याशीच निगडीत एक परंपरा म्हणजे महिलांचे एकमेकांच्या घरी जाऊन होणारे “हळदी-कुंकू”. त्या मध्ये होणारे “नाव/उखाणे” घेण्याची प्रथा. त्यामुळे ह्या POST मध्ये आम्ही युवा पिढीतील लोकांसाठी साजेसे मजेदार उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय.
त्यामुळे ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने जिंकावीत.
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात, संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात, ____ रावांच्या सहवासाने, सुख आले जीवनात.
संक्रांत आहे म्हणून, साऱ्या जनी आल्या नटून, संक्रांत आहे म्हणून, साऱ्या जनी आल्या नटून, ___ रावांच नाव घेते मी दिसते सर्वात उठून…!
नेसले काळी चंद्रकला, हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार, दिला वाण आणि घेतला वसा, बोलावून मैत्रिणी चार, मैत्रिणीच्या गप्पांच्या नादात विसरले सार, ____ राव म्हणाले “घ्या उरकते उशीर झालाय फार”…!
चांदीच्या वाटीत तिळाची वडी, संक्रांतीसाठी काळी चंदेरी साडी, हलव्याचे दागिने चाफ्याची वेणी, जोड लक्ष्मी नारायणावाणी, ____रावांना तीळपोळीचा भरवते घास बघू नका कोणी…!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आजच नाही नेहमीच गोड तुम्ही बोला, मोठ्यांशीही गोड , लहान्यांशीही गोड, कोणीही असो मग लहान थोर, कधीच मोडायचे नाही कोणाचेच मन, मनात शिरून मिळते धन, आमचे असले विचार आहेत थोर, माझ्याशी लग्न केलं ना म्हणून आमचे ____ राव आहेत कित्ती कित्ती हो हुशार….!!!
काळ्या साडीला जरीचा पदर, हलव्याचे दागिने, सोबतीला सुगड पूजन, हळदी कुंकवाचा घातला घाट, _____ राव माझे की प्राण….!
संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान, संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान, ____ रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाच वाण.
तिळगुळाच्या च्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ठ मेळ, तिळगुळाच्या च्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ठ मेळ, ____ रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ!

आपण जर नवीन sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५) शोधत असाल तर आपण योग्य Website वर आलेला आहात. आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये संक्रांतीच्या काळामध्ये उखाणे घेण्याची फार जुनी परंपरा आहे. बऱ्याचदा असेही आढळून आले आहे की, या दिवशी काही ठिकाणी छोटे-मोठे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात जिथे सर्व महिला एकत्र येऊन आपल्या पतीसाठीचा उखाणा घेतात व “वाण” स्वरूपी भेटवस्तू एकमेकींना देतात.
चला तर खास sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५) उखाणे बघुयात.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून, हळदी कुंकवाला जमल्या साऱ्या जणी…मकर संक्रांतीचे औचित्य साधून, हळदी कुंकवाला जमल्या साऱ्या जणी…अन ____ राव नेहमीच असतात , माझ्या ध्यानी मनी!
मकर संक्रांतीचे औचित्य साधून, हळदी कुंकवाला जमल्या साऱ्या जणी…मकर संक्रांतीचे औचित्य साधून, हळदी कुंकवाला जमल्या साऱ्या जणी…अन ____ राव नेहमीच असतात , माझ्या ध्यानी मनी!
नवीन वर्ष आणि पहिला मराठी सण संकारांतीचा (२), ____ आणि _____ आमचा जोडा राहो सात जन्माचा!
कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी (२), ___ रावांचे नाव घेते संकारांतीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी!
सोसाट्याच्या वार्याने सगळीकडे उडते धूळ (२), ___ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ!
सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घातले सात, सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घातले सात, जन्मो जन्माचे नाते जुळले मिळाली ____ रावांची साथ!
दारासमोर काढली रांगोळी फुलांची, दारासमोर काढली रांगोळी फुलांची, __-चे नाव घेते सून आहे मी ___ ची!
रामायण आणि महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण (२), ___ रावांचे नाव घेते घ्या आता संक्रांतीचा वाण!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आईवडीलांसारखी माया नसते ह्या जगात कोणाला (२), ____ रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला!
विड्याच्या पानात पावशेर कात, विड्याच्या पानात पावशेर कात, _____ रावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ.
हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, ____ रावांचे नाव घेते ____ च्या दिवशी!
पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी, पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी, ___ रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी!
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ___चे नाव घेते ____ च्या दिवशी!
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, ___ रावांचे नाव घेते हळदीकुंकू च्या दिवशी…!
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ____ चे नाव गेटे हळदी-कुंकवाच्या वेळी!
गुलाब आहे काटेरी, मोगरा असतो सुगंधी, गुलाब आहे काटेरी, मोगरा असतो सुगंधी, ___ रावांच्या जीवनात मी आहे आनंदी!

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
मोठा उखाणा
(sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५)
काळी चंद्रकळा, गळ्यात मोहनमाळ सजली नटली नार छान, संक्रांतीच्या सणी, हळदी कुंकवाच्या दिनी, परस्पर स्नेहाची देवाणघेवाण लावते हळदी कुंकू, देते तिळगुळ ओटीत देते वाण, उखाणा घेते ____ रावांची अर्धांगिनी राखते तुमच्या सर्वांचा मान…!
संसार रुपी करंजीत प्रेमरूपी सारण, संसार रुपी करंजीत प्रेमरूपी सारण, ___ रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण!
चढता लाली ओठी करिते मी मधुर हास्य, चढता लाली ओठी करिते मी मधुर हास्य, ____रावांच्या आनंदातच आहे मला स्वारस्य!
रत्नजडीत हार अन कंठा वाढविती माझ्या गळ्याची शोभा, रत्नजडीत हार अन कंठा वाढविती माझ्या गळ्याची शोभा, ___ रावांच्या यशोतेजाने उजळून निघाला माझ्या मनाचा गाभा…!
नेसली मी काळी चंद्रकला त्यावर शोभे मोत्यांचा कमरबंद, नेसली मी काळी चंद्रकला त्यावर शोभे मोत्यांचा कमरबंद, ____ रावा सोबत पर्यटन करणे हा आहे माझा आवडता छंद…!
घुंगरांची नाजूक किणकिण निर्मिती माझ्या पायींचे पैंजण, घुंगरांची नाजूक किणकिण निर्मिती माझ्या पायींचे पैंजण, माझ्या आणि ____ रावांच्या प्रितफुलाने धून झाले माझ्या मनाचे अंगण…!
चांदीची शुभ्रधवल जोडावी अन बिरुध्या वाढविती सुवासिनीच्या चरणांच्या मान, चांदीची शुभ्रधवल जोडावी अन बिरुध्या वाढविती सुवासिनीच्या चरणांच्या मान, ____राव सोबत असता समस्यांचे पर्वत मला भासती लहान…!
चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, चहा केला नेवून दिला, चिवडा केला ताजा, ___ चं नाव घेते पहिला नंबर माझा!
मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, ___ साठी मागितले दीर्घायुष्याचे दान!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
(sankranti ukhane marathi 2025 | मकर संक्रांती उखाणे २०२५) महिला प्रमाणे महाराष्ट्रातील पुरुष मंडळी देखील उत्साहाने ह्या सणामध्ये भाग घेत असतात. सर्व जण एकमेकांची भेट घेऊन दिवसा पतंग उडविण्याचा आनंद घेतात आणि संध्याकाळी एकमेकांच्या घरी भेट घेऊन “तीळ-गुळ” वाटप केले जाते आणि आपल्या सर्वा तर माहितीच आहे की तीळ-गुळाची देवाण घेवाण करताना सर्व जण आवर्जून एकमेकांना “तीळ-गुळ घ्या, गोडगोड बोला” असे आवर्जून सांगतात.
काकवी पासून बनवतात गुळ, काकवी पासून बनवतात गुळ, ___ रावांच नाव घेऊन वाटते तिळगुळ…!
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!
आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास, आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास, ____रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास…!
मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, _____रावांच्या पत्नीचे पद अभिमानाने मिरविते..!
नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, ____रावांच्या सहवासात जीवन झाले सुखमय…!
संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, _____रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा…!
कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, _____रावांच नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात…!
नाव घ्या, नाव घ्या म्हणून आता कटू नका गजर, नाव घ्या, नाव घ्या म्हणून आता कटू नका गजर, ___रावांच नाव घ्यायला मी नेहमी हजर…!
टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी ह्या website वर आपल्याला विविध सण, वेग-वेगळ्या समारंभ साठीचे बरेच उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करत राहू.
पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीतला सुगंध, पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीतला सुगंध, ____रावांसोबत जुळले सात जन्माचे ऋणानुबंध…!
चंद्राचा उदय, समुद्राला भरती, चंद्राचा उदय, समुद्राला भरती, ___रावांच्या प्रेमळ शब्दांनी माझे सर्व श्रम हरती…!
लावत होते कुंकू, त्यात पडला मोती, लावत होते कुंकू, त्यात पडला मोती, ____राव माझे पती, सांगा भाग्य माणू किती?
उखाणा घेऊन भागीनिंच्या साप्तगुनांना मिळतो वाव, उखाणा घेऊन भागीनिंच्या साप्तगुनांना मिळतो वाव, आज आहे संक्रांत _____रावांचे घेते मी नाव.
अश्याच Unique उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Special Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
मकर संक्रांती उखाणे साठीचे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest, WhatsApp आणि इतर.
Table of Contents
Toggle