traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे
(traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) “हिमालयात बर्फाच्या राशी…!” हे मराठी उखाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर येतो मराठी संस्कृतीतील खासकरून महिलांसाठीचा पारंपारिक म्हणजे उखाणे घेण्याचा कार्यक्रम. (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) पारंपारिक उखाणे. उखाणे घेण्याची परंपरा नेमकी किती जुनी आहे हे नेमक सांगता येत नसले तरी बऱ्याच पिढ्यान पासून ही मजेदार परंपरा चालू आहे हे मात्र नक्की. बऱ्याच महिला मंडळी कडे जुन्या पारंपारिक उखाण्यांचा दर्जेदार खजिना असतो. जेव्हा एखाद्या समारंभामध्ये आपण त्यांच्या तोंडून असे दर्जेदार मराठी उखाणे ऐकतो ते नक्कीच जाणवते की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किती संपन्न आहे. किती विविध अंगी विचार करून प्रत्येक व्यक्ती उखाणे बनवत असतो. Visualमराठीच्या ह्या POST मध्ये आपल्याला traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आणि आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची मने जिंकावीत.
टिप – खालील दिलेल्या उखाण्यांमध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिकम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
traditional ukhane in marathi for female
Traditional Ukhane | पारंपारिक उखाणे
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, ______ रावाना शेवटी अहोच म्हणायचं !
मंद आहे वारा संथ चाले होडी, मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.
डाळीत डाळ तुरीची, अवघड पायरी विहिरीची, ____ राव म्हणतात भाकरी घेऊन ये न्ह्यारीची तरच चोळी घेतो जरीची!
राजहंसाच्या पिलास चार हवा मोत्याच्या (२), ____ रावांच नाव घेते आशीर्वाद देते सौभाग्याचा!
सात जन्माची पुण्याई फळाला आली आज (२), ____ रावांच्या हाताने घालते मंगळसूत्राचा साज!
दागिन्यांनी नटले, नेसले सुंदर पैठणी, दागिन्यांनी नटले, नेसले सुंदर पैठणी, ____ च्या संसारात रमले तरी माहेरच्या येतात आठवणी.
देवासमोर निरंतर पेटत असते निरांजनाची वात, देवासमोर निरंतर पेटत असते निरांजनाची वात, अन ___ बरोबर साता जन्माचे फेरे घेतले सात…!
प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विणले, प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विणले, ___ रावांच्या साथीने जीवनपुष्प बहरले!
टिप – खालील दिलेल्या उखाण्यांमध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिकम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आपण जर पारंपारिक उखाणे (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. आपल्या सर्वांना माहितीच आहे कि उखाणे घेणे किवा नाव घेणे ही महाराष्ट्रातील अत्यंत जुनी पद्धत/परंपरा आहे. त्यामुळे जुन्या उखाण्यांची मजा काही काही औरच. आम्ही त्यामुळे ठरवूनच अत्यंत जुन्या आणि पूर्वापार वापरले जाणाऱ्या उखाण्यांच्या खजीना तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आपण सर्व उखाणे नीट वाचावे आणि त्यातून आपल्या आवडीचे खास उखाणे पाठ करून घ्यावे जेणेकरून कोणत्याही प्रसंगी आपण नाविन्यपूर्ण उखाणा घेऊ शकाल.
एकत्रित बघितले स्वप्ना, आज प्रत्यक्षात साकार झाले, अन ____ रावांचे नाव घेताना मन आनंदाने भरून आले!
कमलावरती उभी लक्ष्मी मोरावर्ती सरस्वती, कमलावरती उभी लक्ष्मी मोरावर्ती सरस्वती, ____ रावांचे नाव घेते खरी मी भाग्यवती!
सासू सासऱ्यांची सून, वाहिनी मी दिर-नंदेची, जाऊबाईचा स्वभाव आठवण येई बहिणीची, सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते, मला खुश ठेवायचं आहोंना छान जमते!
अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, ___ रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर!
टिप – खालील दिलेल्या उखाण्यांमध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिकम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
traditional ukhane in marathi for female
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, मंगळागौरीच्या दिवशी नाव घेती मी ____ ची सौभाग्यवती!
संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, ___ रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी!
काळ्या मण्यांचे मंगळसुत्र लेणे आहे सौभाग्याचे, काळ्या मण्यांचे मंगळसुत्र लेणे आहे सौभाग्याचे, अन ____ च्या रुपात मौल्यवान असे देणे लाभले परमेश्वराचे!
भरजरी साडी नाकामध्ये नथनी अन कपाळी शोभे चंद्रकोर… अन ____ रावांचे आयुष्यात येणे यात भाग्य माझे थोर!
भगवान शिवशंकाराचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे काशीला, भगवान शिवशंकाराचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे काशीला, अन ___ रावांचे नाव घेते सगळे जण आहेत साक्षीला!
अंगावर साडी बसायला चारचाकी गाडी, कानात डूल केसात माळले गुलाबाचे फुल, हातात हिरवा चुडा घेतला अगरबत्तीचा पुडा, जोडीने घेतले दर्शन महादेवाचं कपाळी कुंकू लावलं ____ रावांच्या नावाच!
हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ____ रावांचे चरण, हेच माझे चारही धाम!
महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ, महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ, ____राव मी माझे प्रेम असेच राहू दे अतूट!
टिप – खालील दिलेल्या उखाण्यांमध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिकम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
Traditional Ukhane in Marathi | पारंपारिक मराठी उखाणे
ह्या POST मध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) आम्ही मुख्यत्वे महिलांसाठीच्या पारंपारिक उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. उखाणे किवा नाव घेणे हि मुळातच पारंपारिक रीत असून मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे नव्या युगाचा जरी उखाण्यावर प्रभाव पडत असला तरी पारंपारिक उखाण्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळेच आम्ही हा पारंपारिक उखाण्यांचा खजिना तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत. आपण जरूर वाचवा आणि शक्य तेवढ्या व्यक्ती पर्यंत नक्की share करायला विसरू नये.
लाल रंगाची नेसली मी पैठणी, लाल रंगाची नेसली मी पैठणी, ___ रावांच नाव घेते नीट ऐका सगळ्या जणी!
सत्यनारायनासमोर मागणे मागते, सर्वांना मिळूदे चांगले आरोग्य, सत्यनारायनासमोर मागणे मागते, सर्वांना मिळूदे चांगले आरोग्य, ___ रावांच्या रुपात भेटला, मला जीवनसाथी योग्य!
सातो जन्मी तुम्हीच पती मिळावे हीच आस आहे माझ्या मनी, सातो जन्मी तुम्हीच पती मिळावे हीच आस आहे माझ्या मनी, अन गळ्यात मंगळसूत्र बांधून झाले ___ रावांची अर्धांगिनी!
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ___ झाली आज आमची गृहमंत्री !
गळ्यात मंगसुत्र, मंगलसूत्रात डोरलं, गळ्यात मंगसुत्र, मंगलसूत्रात डोरलं, ___ रावांच नाव माझ्या हृदयात कोरलं!
श्लोक रामदासांचे आहेत किती छान, श्लोक रामदासांचे आहेत किती छान, ____ रावांच्या संसारात हरवले माझे भान!
नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, ___ च्या सहवासात जीवन झाले सुखमय!
टिप – खालील दिलेल्या उखाण्यांमध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिकम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
Traditional Ukhane for Bride | नवरी साठी पारंपारिक उखाणे
मोठा उखाणा
बसले होते घरात पाहत होते आरश्यात, माझ्यावर होते सासरी सुखाची बरसात जशी दुधावर असते मऊ साय, सासू माझी आहे दुसरी माय! कधीच नाही दाखवत मला धाक, सासरे म्हणजे माझे दुसरे बाप! प्रेमाने घालते मला खाऊ _ आहे माझी जाऊ. नेहमीच पाठीशी असतात खंबीर _ आहेत माझे दीर. जी देते बहिणीची माया आणि आनंद _ आहे माझी नणंद! कधीच जात नाही मी बावरून कारण पतीदेव घेतात मला सावरून. _ रावांच्या नावाची लावते मी चंद्रकोर _ सारखे सासर मिळाले भाग्य माझे थोर!
गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग, गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग, ___ रावांच्या संसारात आहे मी दंग!
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!
वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीची काया, ___ रावांचे नाव घेऊन पडते ____च्या पाया!
महाराष्ट्रातील संत परंपरेच्या प्रतीभेने डोळे दिपले जगाचे, महाराष्ट्रातील संत परंपरेच्या प्रतीभेने डोळे दिपले जगाचे, ___ सह संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
जेथे भावना तेथे शब्द, जेथे शब्द तेथे कविता, जेथे भावना तेथे शब्द, जेथे शब्द तेथे कविता, ___ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता.
प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनांची, त्याग जाणावा राम सीतेचा, ____ नाव घेते आशीर्वाद द्या अखंड सौभाग्याचा!
मंगळसूत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, मंगळसूत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, ____ रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर!
टिप – खालील दिलेल्या उखाण्यांमध्ये (traditional ukhane in marathi for female | पारंपारिक महिलांसाठीचे खास उखाणे ) __ दिलेल्या रिकम्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा पूर्ण करायचा आहे.
आमच्या Visualमराठी ह्या Webportal वर आपल्याला विविध सणासाठी आणि वेग-वेगळ्या सण, उत्सव, सोहळे आणि समारंभ साठीचे बरेच उखाणे उपलब्ध आहेत आहेत. तसेच आमचा नेहमीच प्रयत्न असेल की आपल्या पर्यंत Traditional Content पुरवावा. तसेच आम्ही नेहमी महाराष्ट्राबद्दलची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करू.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ____ चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
मैत्री सारख्या नात्यात नसावा स्वार्थ, मैत्री सारख्या नात्यात नसावा स्वार्थ, ____ मुळेच आहे माझ्या जीवनाला अर्थ.
जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, ____ रावांची आहे मी अर्धांगिनी.
काव्य आणि कविता, सागर आणि सरिता, काव्य आणि कविता, सागर आणि सरिता, ___ रावांचे नाव घेते तुमच्या करिता.
महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, ___ रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून.
जाई-जुईचा वेळ पसरला दाट, जाई-जुईचा वेळ पसरला दाट, ____ रावांन बरोबर बांधली मी जीवनाची गाठ.
सासर घरी जाताना सोडावे लागते माहेर, सासर घरी जाताना सोडावे लागते माहेर, ____ राव जीवनात मला प्रीतीचा आहेर!
कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिक पणाची जोड, कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिक पणाची जोड, ____रावांचे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.
अश्याच पारंपारिक उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Traditional Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू.
पारंपारिक उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.