trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२५
(trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२५ )आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध उत्सव, सण, समारंभामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहे. त्यातील अत्यंत महत्वाची वेळ म्हणजे जेव्हा नवीन जोडपे म्हणजेच नववधू आणि वर त्यांच्या राहत्या घरी पहिल्या वेळेस प्रवेश करत असतात. तेव्हा नव-वधू पहिल्यांदा गृहप्रवेश करणार असते आणि तिची सर्वांसोबत पहिलीच भेट असते. तेव्हा होणारा संवादाची सुरुवात म्हणून गृहप्रवेश उखाण्याचे फार महत्व आहे. लग्न समारंभ असो, नवीन पाहुण्यांकडे काही निमित्ताने येणे जाने असो तेव्हा आवर्जून नव दाम्पत्याला नाव म्हणजेच उखाणे घेण्यासाठीचा आग्रह हा केलाच जातो. हे युग Internet/social media चे युग मानले जाते आणि आपल्या सर्वांचा जीवनाचा Social Media एक प्रकारे भाग झालेले आहेत, त्यामुळेच त्यावरच्या trending गोष्टीनला अनुसरून जर उखाणे असतील किवां उखाणे/नाव घेतले गेले तर आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.Visualमराठीच्या ह्या POST मध्ये आपल्याला trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रियजणांसोबत जरूर Share करावे…टिप – खालील मराठी उखाणे trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२५ आपण Copy Button वर Click करून, share करू शकता.
आई अंबाबाई ह्या जगाची स्वामिनी, आई अंबाबाई ह्या जगाची स्वामिनी, ___ रावांचे नाव घेते मी त्याची अर्धांगिनी!
मंगलसुत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खून, मंगलसुत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खून, ___ रावांचे नाव घेते ___ची सून!
प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन वेगळा (२), _____ नी लाडू खावा एक सोबत सगळा!
स्वप्ना सत्य झाले, नाही ठरला भास, स्वप्ना सत्य झाले, नाही ठरला भास, ____ ला भरवते गोड गुलाबाजामनाचा घास!
राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, अन ___ रावांचे नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा..!
चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा, चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा,____ रावांच नाव घेते सासूबाईना बोलवा!

(trending ukhane in marathi | एकदम खास उखाणे २०२५ )
गृहप्रवेश साठी मोठा उखाणा
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विणले, प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विणले, ___ रावांच्या साथीने जीवनपुष्प बहरले!
रसाळ,मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा… अन ___ रावांच्या नावातच अडकलाय जीव माझा!
एकत्रित बघितले स्वप्ना, आज प्रत्यक्षात साकार झाले, अन ____ रावांचे नाव घेताना मन आनंदाने भरून आले!
कमलावरती उभी लक्ष्मी मोरावर्ती सरस्वती, कमलावरती उभी लक्ष्मी मोरावर्ती सरस्वती, ____ रावांचे नाव घेते खरी मी भाग्यवती!
सासू सासऱ्यांची सून वाहिनी मी दिर-नंदेची, जाऊबाईचा स्वभाव आठवण येई बहिणीची, सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते, मला खुश ठेवायचं आहोंना छान जमते!
दारात काढली रांगोळी रांगोळीला काढली लक्ष्मीची पावलं, दारात काढली रांगोळी रांगोळीला काढली लक्ष्मीची पावलं, ___ रावांच साध भोळ रूप माझ्या मनाला भावलं!
उखाणा घेते मी खूपच EASY, उखाणा घेते मी खूपच EASY, ___ राव असतात नेहमी कामामध्ये BUSY!
पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घात… अन ___ रावन्सोबत बांधते आयुष्यभराची गाठ!
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ___चे नाव घेतो ____ च्या घरात!
दोन गुणिले दोन केल्यावर होतात FOUR (२), ____ चे नाव घेता सगळी म्हणतात ONCE MORE!
संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, ___ रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी!
निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, ___ रावांसोबत मला फिरायचे आहे सारे जग!

सत्यनारायणाची पूजा चौरंगावर मांडली, सत्यनारायणाची पूजा चौरंगावर मांडली, ____ रावांसाठी माहेरची वेस मी ओलांडली!
नको मोहन माळ नको हिर्यांचा हार, नको मोहन माळ नको हिर्यांचा हार, ___ रावांच्या जीवनात मी सुखी आहे फार….!
बाहेर मुसळधार पाऊस अन त्यात आल्याचा गरमगरम चहा… अन ____ रावांच नाव घेताना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तरी पाहा!
यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, ___ रावांच्या संसारात मी सुखी आहे सासरी!
खोल्यांत खोल्या सात खोल्या, उघडून गेले आत, मधल्या खोलीत ताट, लाडवान भरलं काठोकाठ, ताटाला केली खुण ___ रावांचे नाव घेते ___ ची सून!
समुद्रात येत असतात अथांग लाटा, समुद्रात येत असतात अथांग लाटा, अन ____ बरोबरच चालायच्या आहेत जीवनाच्या सर्व वाटा!
पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल… पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल… अन ____ रावांच नाव घेते जोडी आमची अनमोल!
कळी सारखे उमलावे, फुला सारखे फुलावे, कळी सारखे उमलावे, फुला सारखे फुलावे, अन ____ रावांच्या सानिध्यात आयुष्य माझे खुलावे!
पौर्णिमेच्या चंद्राचे रूप दिसते हसरे, पौर्णिमेच्या चंद्राचे रूप दिसते हसरे, अन ___ रावांचे नाव घेते यापेक्षा सुख नाही दुसरे !
मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, मटणाच्या भाजीमध्ये घातला काळा मसाला, ____च नाव तुम्हाला माहितीये तरी मला विचारता कश्याला!
तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, ___ तुला बायको बनवून फिर्वेन माझ्या गाडीवर!
मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, ___ रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा!
एक होती चिऊ, एक होती काऊ, एक होती चिऊ, एक होती काऊ, __ ना घास भरवला तर मी काय खाऊ!
शिंपल्यात सापडले माणिक मोती, शिंपल्यात सापडले माणिक मोती, ___ रावांच्या जीवनात झाले मी सारथी!
स्वप्न, सत्य झाले, नाही ठरला भास, ____ ला भरविते गोड गुलाबजामचा घास!
जुईची वेणी जाईचा गजरा, जुईची वेणी जाईचा गजरा, आमच्या दोघांवर्ती सगळ्यांच्या नजरा.
आशीर्वाद लाखाचा नमस्कार फुलाचा, आशीर्वाद लाखाचा नमस्कार फुलाचा, ____ रावांचा नाव गेटे संसार करते सुखाचा!
वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीची काया, वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीची काया, ___ रावांचे नाव घेऊन पडते ____च्या पाया!
मोह नसावा पैश्यांचा, गर्व नसावा रूपाचा, मोह नसावा पैश्यांचा, गर्व नसावा रूपाचा, ____ माझे पती त्यांना घास घालते श्रीखंड पुरीचा.
सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान, सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान, ____ चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान!
वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड, वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड, ___ रावांच्या जीवनाला माझी जोड!
सतारीचा नाद, वीणा चा झंकार, ___ च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार!
संसाररूपी मार्गावर दोन प्रवासी नवे, संसाररूपी मार्गावर दोन प्रवासी नवे, ___ हेच पती सात जन्मी हवे.
नेत्राच्या निरांजनात प्रीतीची लावते वात, नेत्राच्या निरांजनात प्रीतीची लावते वात,___ च्या बरोबर करते सुखी संसाराची सुरुवात..!
instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत आमचे खूप मुडी!
विहीर भरल्या काठोकाठ नदीला आला पूर, विहीर भरल्या काठोकाठ नदीला आला पूर, ___ च्या साठी आई-वडील केले दूर.
Recent Posts
अश्याच एकदम खास मराठी उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Trending Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle