funny ukhane in marathi 2025 | चावट मराठी उखाणे २०२५

funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४

 Visualमराठी

आपण जर Funny ukhane/चावट (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) मराठी उखाणे शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. ह्या POST मध्ये आम्ही युवा पिढीतील लोकांसाठी साजेसे मजेदार/Funny  उखाण्यांचा संग्रह घेऊन आलोय. आम्ही येथे आवर्जून नमूद करू इच्छितो की खालील दिलेली उखाणे आपण व्यवस्तित वाचून आणि संपूर्ण अर्थ समजून जास्तीत जास्त आपल्या समवयस्क व्यक्ती समोर घ्यावेत जेणेकरून कोणालाही हिनाविल्यासारखे वाटणार नाही. तसेच ज्या व्यक्तींची विनोद बुद्धी आणि समजूतदार पणा शाबूत आहे त्यांच्या समोरच हे उखाणे/नाव घ्यावीत, जेणेकरून वादविवादाचे प्रसंग टाळता येतील.बदलत्या काळानुसार उखाण्यांची शब्द रचनाही बदलत चालली आहे आणि ती बदलायलाच हवी. कारण उखाणे म्हणेज शेवटी चालू काळाला अनुसरून केलेली एक शब्द रचनाच असते. ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४ उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण ते स्वतः जरूर वाचावे आणि ह्या छोट्या-मोठ्या समारंभातील आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांची माने नक्की जिंकावीत.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पूर्ण करायचा आहे.

_____ (शहराचे नाव) मध्ये बंगला उभा आहे ऐटीत, _____ (शहराचे नाव) मध्ये बंगला उभा आहे ऐटीत, जळू नका तुम्ही लोकहो आमचे ___ राव आहेत आय.टी त.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ____ आहे माझी ब्युटी क्वीन.

_____चा नि माझा संसार होईल सुखकर, _____चा नि माझा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चिरेण भजी आणि तो लावेल कुकर.

स्टुलावर स्टूल बत्तीस स्तूल, स्टुलावर स्टूल बत्तीस स्तूल, ____ राव एकदम ब्युटीफुल.

कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी, कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी, ____ माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.

A B C वन टू थ्री, A B C वन टू थ्री, ____ चं नाव घेते मला करा फ्री.

मोबाईल वर एफ एम एकते कानात हेडफोन टाकून, मोबाईल वर एफ एम एकते कानात हेडफोन टाकून, आणि ____ रावांना मिस call देते एक रुपया balance राखून.

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, ____ चं नाव घ्यायला मला नाही आळस.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पूर्ण करायचा आहे.

funny ukhane in marathi 2024
funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४
आपण जर नवीन funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलेला आहात.आपल्या सर्वांना कल्पना असेलच की नवरा-बायकोचं नात हे जगातील सर्वात वेगळा असा नात असत. कारण ते दोघे एकमेकांचे मित्रही असतात, आदर हि असतो आणि कधी कधी हसत खेळत रागही असतो म्हणूनच एकमेकांना चिडवून मजा घेणे हे काही त्यांच्यासाठी नवीन नसते उलट ओळखींच्या मध्ये असं करण्यासाठी प्रोत्साहन भेटते. चला तर खास funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) उखाणे बघुयात.

पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, ____ चे नाव घ्यायला अडलंय माझ खेटर.

सचिनच्या bat ला करते नमस्कार वाकून, सचिनच्या bat ला करते नमस्कार वाकून, _____ रावांच नाव घेते पाच गडी राखून.

इराणी च्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, इराणी च्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, _____ रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.

_____रावांची थोरवी मी सांगत नाही, _____रावांची थोरवी मी सांगत नाही, कीतीही “प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत!!

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा, MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा,
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

कॉम्पुटर ला असते फ्लॉपी डिस्क, कॉम्पुटर ला असते फ्लॉपी डिस्क, ____शी लग्न करून मी घेतलीय मोठी रिस्क.

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान, निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान, ____ रावांचा आवडता चंद म्हणजे सतत मदिरापान.

गोव्यावरून आणले काजू, गोव्यावरून आणले काजू, ____ रावांच्या थोबाडात वाजवायला मी कश्याला लाजू!!!

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पूर्ण करायचा आहे.

कुत्र्यात कुत्र अल्सेश्यान कुत्रं, कुत्र्यात कुत्र अल्सेश्यान कुत्रं, ____ रावांनी बांधले गळ्यात मंगळसूत्र.

विड्याच्या पानात पावशेर कात, विड्याच्या पानात पावशेर कात, _____ रावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ.

संपात संप कामगारांचा संप, संपात संप कामगारांचा संप, _____ रावांच्या हातात ढेकणांचा पंप.

तेलाच्या दिव्याला तुपाची वात, तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ____रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट.

करत होते वेणीफणी समोर होता आईना, करत होते वेणीफणी समोर होता आईना, ____ रावांनी मारली मिठी, पण मी त्यात मावेना.

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू, चांदीच्या ताटात ठेवले होते गहू, लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.

शिडीवर शिडी बत्तीस शिडी, शिडीवर शिडी बत्तीस शिडी, ____ ओढतात बिडी न मी लावते काडी.

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरविते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.

funny ukhane in marathi 2024
funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या जागी आपल्याला आपल्या जोडीदार/जीवनसाथीचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पूर्ण करायचा आहे.

ह्या POST (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) आम्ही मुख्यत्वे नव्या दमाच्या तरुणाई साठी च्या मजेदार उखाण्यावर जास्त भर दिलेला आहे. उखाणा जर चावट किवां मजेदार वर अनुसरून असेल तर एक तर तो जुना म्हणजेच नेहमी घेतला जाणारा आणि कंटाळवाणा वाटत नाही.

बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या, बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या, ____ रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट, लाडाने जवळ गेले, केली जरा घसट, ____ राव एकदम खेकसले, फारच बाई तिरसट.

आजघर माजघर माजघराला नाही दार, आजघर माजघर माजघराला नाही दार, ____ रावांच्या घरात मात्र खिडक्या २ हजार.

रेशीमच्या सदऱ्याला प्लास्टिक चे बक्कल, रेशीमच्या सदऱ्याला प्लास्टिक चे बक्कल, _____ रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.

___ पुढे मांडले जेवणाचे ताट, ___ पुढे मांडले जेवणाचे ताट, ___ मुळे लागली माझ्या जीवनाची वाट!

तळ्यातल्या चिखलात लाल कमळ उमलले, तळ्यातल्या चिखलात लाल कमळ उमलले, गणपतराव खड्डात पडले, त्यांना दुसऱ्याने काढले.

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, गणपतराव दिसतात साधे, पण आतून इकदम चालू.

कालच पिक्चर पहिला नाव त्याचे सायको, कालच पिक्चर पहिला नाव त्याचे सायको, फाल्गुंरावांच नाव घेते _____ रावांची बायको.

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पूर्ण करायचा आहे.

नेहमी आपल्या आवडीचे मजेदार  ४-५ उखाणे (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पाठच असले पाहिजे, कारण लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरही किमान १ वर्ष कोण कधी “नाव घे” म्हणेल याच्या काही नेम नाही. त्यामुळे आपल्याला जर अजून दर्जेदार उखाणे हवे असतील तर नक्कीच आमच्या इतर उखाणे POST/Page वर जाऊन हवे तसे उखाणे शोधू शकता. आपल्याला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर आम्हाला जरूर कळवा.

अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका, अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका, नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका.

पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जनी, पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जनी, सोडल्या तिघीजणी नी झालो ____चा धनी

सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले, सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले, ____ रावांच नाव घेते मैत्रिणींनी अडवले.

इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वोअतर, इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वोअतर, ___ रावांच नाव घेते मी त्यांची होम मिनिस्टर.

बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू, बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू, ___ राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू!

लग्न झालं की नाव घेण हा जणू कायदा, लग्न झालं की नाव घेण हा जणू कायदा, ____ तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

फिरायला जायला तयार होते मी झटकन, फिरायला जायला तयार होते मी झटकन, अन ____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन!

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, ___ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण!

टिप – खालील दिलेल्या सर्व उखाण्यांमध्ये ______ दिलेल्या रिक्त जागी आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव गृहीत धरून उखाणा (funny ukhane in marathi 2024 | चावट मराठी उखाणे २०२४) पूर्ण करायचा आहे.

धरला ह्यांनी हात वाटली मला भीती, धरला ह्यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले ___राव अशीच असते प्रीती!

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मेल्या, थोबाड कर इकडे!

रेशमी सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल, रेशमी सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल, ____ राव एवढे handsome पण डोक्यावर मात्र टक्कल!

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, ___ नसलीस की Online मला नाही करमत!

एक होती चिऊ आणि एक होती काऊ, एक होती चिऊ आणि एक होती काऊ, ____च नाव घेतो डोक नका खाऊ!

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपूर चुका, नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपूर चुका, ____चे नाव घेतो द्या सगळ्याजणी एक एक मुका!

राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, अन ___ रावांचे नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा..!

केसर दुधात टाकले काजू, बदाम, जायफळ, केसर दुधात टाकले काजू, बदाम, जायफळ, ____चं नाव घेतो वेळ न घालवता वायफळ!

अश्याच Latest आणि Funny उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Funny Content पुरविण्याचा प्रयत्न करत राहू.

चावट उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया, गुगल, Pinterest आणि इतर.