gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२५
(gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२५)आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध समारंभामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहे. त्यातील अत्यंत महत्वाची वेळ म्हणजे जेव्हा नवीन जोडपे म्हणजेच नववधू आणि वर त्यांच्या राहत्या घरी पहिल्या वेळेस प्रवेश करत असतात. नव वधूही पहिल्यांदाच आपल्या पतीच्या घरी प्रवेश करत असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे असते आणि त्याच समारंभास अजून रंगतदार बनवते ते म्हणजे उखाणे घेण्याची परंपरा. ह्यामुळे वातावरण हलके होवून खेळी मेळीने गृहप्रवेश होण्यास मदत होते.त्यामुळेच ह्या Visualमराठीच्या POST मध्ये आपल्याला gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करा..शुभमुहूर्तावर शुभदिनी आली आमची वरात, शुभमुहूर्तावर शुभदिनी आली आमची वरात, ____ रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात.
दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, ____ रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल!
दारातील तुळशीला पाणी घालते गार, दारातील तुळशीला पाणी घालते गार, ____रावांचे नाव नंतर घेते रात्र झाली फार!
देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा, देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा, ___ नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा.
मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, ____ चे पत्नी पद अभिमानाने मिरवते!

(gruha pravesh ukhane in marathi | गृहप्रवेश साठीचे खास उखाणे २०२५ )
गृहप्रवेश साठी मोठा उखाणा
___ तालुक्यात ___ माझे गाव गावात होती माडी माडीवर नेसली साडी साडीला मावला चाप ___ माझा बाप दारात होती जाई ___ माझी आई, पाण्याला गेली गवळण ___ माझी मावळण पाण्यात होती नाव __ माझा भाव समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती ___ राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती!चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप, चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप, __ रावां समवेत ओलांडते मी आज माप!
सनई आणि चौघडे वाजे सप्तसुरात, सनई आणि चौघडे वाजे सप्तसुरात, ___ रावांचे नाव घेते, ___ च्या घरात!
नवे-नवे जोडपे, आशीर्वादा साठी वाकले, नवे-नवे जोडपे, आशीर्वादा साठी वाकले, ___ रावासोबत, मी सासरी पाऊल टाकले!
हिऱ्याला कोंदण सोन्याचे, प्रेमाला कोंदण नात्याचे, हिऱ्याला कोंदण सोन्याचे, प्रेमाला कोंदण नात्याचे, ____ नाव घेते सर्वांच्या आग्रहाचे.
जगाचे अंगण, मनाचे वृंदावन, जगाचे अंगण, मनाचे वृंदावन, ___ रावांचे नाव हेच माझे भूषण!
नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सारी, नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सारी, ___चं नाव घेते ___ च्या घरी!
सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ, सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,___ पती मिळाले जीवन झाले कृतार्थ!
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ___चे नाव घेते ____ च्या दिवशी!
कर्तव्याच्या तारका चमकतात आपत्तीच्या ढगात, , _____ची गृहलक्ष्मी होऊन आले नव्या घरात!
नव्या संसाररूपी आयुष्याची नवी-नवी गाणी, नव्या संसाररूपी आयुष्याची नवी-नवी गाणी, अन ___ रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी!
गणेशाच्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात, गणेशाला स्मरून करू विघ्नावर मात ____ रावांची साथ लाभली सून बनून आले मी ह्या घरात!
देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वाचन घेतली सात जन्माची, अन पुढील आयुष्याला सोबत मिळाली, ___ रावांच्या प्रेमाची!

इंद्रधनुष्य दिसते जेव्हा पावसात असते ऊन, इंद्रधनुष्य दिसते जेव्हा पावसात असते ऊन, अन ____ रावांशी लग्न करून झाले ___ घराण्याची सून…!
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ___चे नाव घेतो ____ च्या घरात!
थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने जुळली जन्मोजान्माची गाठ, अन ____ रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट!
सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, ___ रावांचे नाव घेण्यास सगळ्यांनी अडविले!
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले, नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले, ___ रावासोबत मी सासरी पाऊल टाकले!
सनई चौघडे वाजले, लग्न लागले सप्तसुरात, ___ रावांचे नाव घेऊन प्रवेश करते आज मी नव्या घरात!
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल, उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल, ___ रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल!
आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ___ रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश!
सुखी संसारासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मी घेते, सुखी संसारासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मी घेते, अन ___ च्या साथीने माप ओलांडून गृहप्रवेश मी करते!
शुभ म्हुर्तावर लग्न पार पडले वाजत गाजत आली वरात…. अन ____ रावांचे नाव घेत पहिले पाऊल टाकते घरात..!
लेक होते आता झाले ____ ची सून (२), ____ चे नाव घेते गृहप्रवेश करून!
वाड्यात वाडे सात वाड्याला सात दारे सात दाराला सात कुलुपे सात कुलुपांना सात किल्ल्या उघडून बघते आत अधघर अधघरात मधघर मधघरात पलंग पलंगावर गाधी गढीवर उशी उशीवर वाटी वाटीत खोबर्याचे काप ___ रावांच्या उंबरठ्यावर ओलांडून येते आता माप!
साध्या वरणात भातात साजूक तूप घालायचं, साध्या वरणात भातात साजूक तूप घालायचं, _____ रावांच नाव घेत आता ____ च्या घरात ENTER व्हायचं!
श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी, श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी, _____रावांच नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी!
Recent Posts
अश्याच नवनवीन उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट देत जा. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Quality Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle