latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२५
(latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२५ )
आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये विविध समारंभामध्ये उखाणे latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२५ घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आहेत आणि त्यासाठी निमित्तही फार आहेत. त्यामुळे Visualमराठी आपल्या सर्वांसाठी नवीन/Latest उखाण्यांचा खजिना घेऊन आलेलो आहोत. ह्या संग्रहामध्ये आम्ही एकदम नाविन्यपूर्ण असे उखाणे गोळा करून आपल्यासमोर सादर करत आहोत. जेणेकरून कोणत्याही उखाणे किवां नाव घेण्याच्या प्रसंगी तुमची अडचण होणार नाही आणि तुम्ही दिलखुलास उखाणा घेऊन सर्वांची मने जिंकाल.
Visualमराठीच्या ह्या POST मध्ये आपल्याला latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२५ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण ते स्वतःसाठी जरून वाचावे आपल्या प्रिय जणांसोबत नक्की Share करावे…
टिप – खालील मराठी उखाणे latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२५ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.
छोटासा हृदय तू माझ चोरलय, छोटासा हृदय तू माझ चोरलय, ___ त्यावर नीट बघ तुझंच नाव कोरलंय!
छ. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्तीने, छ. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्तीने, ____ रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्तीने.
जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मिचा वास, जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मिचा वास, ___ रावांना भरविते श्रीखंडाचा घास!
हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, ____ बसले दारात, आता मी जाऊ कशी घरात.
चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा, चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा, ____ रावांच नाव घेते सासूबाईना बोलवा!
जाई-जुईच्या वेलीला कळ्या येतात दाट, जाई-जुईच्या वेलीला कळ्या येतात दाट, ____ रावांच नाव घेते सोडा माझी वाट.
टिप – खालील मराठी उखाणे latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२४ आपण Copy Button वर Click करून, आपल्या Social Media App वर share करू शकता.

(latest ukhane in marathi | नवीन मराठी उखाणे २०२५)
मराठी मोठा उखाणा
आपण हि POST शेवट पर्यंत जरूर वाचावी तेव्हा आपल्याला लगेच कळेल की आम्ही गोळा केलेले सर्व उखाणे नाविन्यपूर्ण असून आपला आनंद द्विगुणित करणारे आहेत.उखाणा – दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले, पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले, जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी, ____ राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी!अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर, ___ रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर!
मोदकांचा केला नेवैद्य, तर फुलांचा केला हार, मोदकांचा केला नेवैद्य, तर फुलांचा केला हार, अन ___ रावांचे नाव घेत बाप्पाच्या पूजेला झाले मी तयार!
निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग, ___ रावांसोबत मला फिरायचे आहे सारे जग!
सोनेरी स्वप्नांची पाहत, त्यात उंच गुढीचा थाट, सोनेरी स्वप्नांची पाहत, त्यात उंच गुढीचा थाट, अन ___ रावां सोबत बांधली साता जन्माची गाठ!
नाते टिकवून ठेवण्यासाठी चांगली असावी दृष्टी, नाते टिकवून ठेवण्यासाठी चांगली असावी दृष्टी, ____ राव आले आयुष्यात म्हणून चांगली वाटते सृष्टी!
साजिरे सुंदर रूप पाहून, सारखी भुरळ पडते मनाला, साजिरे सुंदर रूप पाहून, सारखी भुरळ पडते मनाला… अन ___ च्या प्रेमात मन हरवून जाते क्षणाक्षणाला!
कळी हसली, फुल फुलले मोहरून आल सुगंध, कळी हसली, फुल फुलले मोहरून आल सुगंध, ___ रावांमुळे जीवनात बहरून आलाय आनंद!
गुलाबाच्या झाडांना काट्यांचा कहर, गुलाबाच्या झाडांना काट्यांचा कहर, ___ रावांनी फिरवले मला संपूर्ण पुणे शहर!
पाहताच क्षणी, नजरेला नजर भिडली, पाहताच क्षणी, नजरेला नजर भिडली, अन ____च्या प्रेमाची नशा अलगदच मला चढली!
सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते, सुबकदार नक्षी, सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते, सुबकदार नक्षी, अन ____ रावांचे नाव घेते सर्व आहेत साक्षी!
मांगल्याचा गुढीला घातल्या साखरेच्या गाठी, मांगल्याचा गुढीला घातल्या साखरेच्या गाठी, ____ रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी!
मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, ___ रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा!

जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मिचा वास, जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मिचा वास, ___ रावांना भरविते श्रीखंडाचा घास!
सासरच्या उंबरठ्या पल्याड माझ माहेरच मला दिसत, सासरच्या उंबरठ्या पल्याड माझ माहेरच मला दिसत, ____ रावांशी लग्न झाल्यावर कळल सुख म्हणजे नक्की काय असत…!
नेसली मी नवी साडी त्याला लावला अत्तर, नेसली मी नवी साडी त्याला लावला अत्तर, ___ नी शिकवलं तेच माझे मास्तर…!
यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, ___ रावांच्या संसारात मी सुखी आहे सासरी!
भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवदगीता, भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवदगीता, ___ नाव घेते तुमच्या सर्वांच्या करिता!
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध, बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध, ___ रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध!
पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल… पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल… अन ____ रावांच नाव घेते जोडी आमची अनमोल!
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती, गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती, ____ रावांनी सुखी राहावे ही परमेश्वराला विनंती!
त्यांचा नी माझा संसार होईल सुखकर, त्यांचा नी माझा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चिरेण भाजी आणि हे लावतील कुकर…!
नेत्राच्या निरांजनात प्रीतीची लावते वात, नेत्राच्या निरांजनात प्रीतीची लावते वात, ___ च्या बरोबर करते सुखी संसाराची सुरुवात..!
instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, instagram च्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत आमचे खूप मुडी!
नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, ___ माझा राजा आणि मी त्याची राणी!
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट, निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट, ____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे, हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे, ___ रावांचे नाव घेते देवापुढे/सत्यनारायणापुढे.
स्वप्न, सत्य झाले, नाही ठरला भास, स्वप्न, सत्य झाले, नाही ठरला भास, ____ ला भरविते गोड गुलाबजामचा घास!xa
पार्लेजी बिस्कीट, रामबंधुचा मसाला, पार्लेजी बिस्कीट, रामबंधुचा मसाला, ____ रावांच नाव घ्यायला आग्रह कश्याला.
वाड्यात वडा बटाटवडा, वाड्यात वडा बटाटवडा, ____ रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
कुंकू लावत ठसठशीत, हळद लावते किंचित, कुंकू लावत ठसठशीत, हळद लावते किंचित, ____ आहेत माझे पुर्व संचित.
दुधाचे केले दही, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, दुधाचे केले दही, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, ____चं नाव घेतो मी ___ रावांचा पठ्ठा.
सासऱ्याच्या मांडवात पंच पक्वनाच्या राशी, सासऱ्याच्या मांडवात पंच पक्वनाच्या राशी, पोट्टे पोट्टे जेवून गेले, जावई राहिला उपाशी.
हिरवा शालू लेवुनी येतो श्रावण महिना, हिरवा शालू लेवुनी येतो श्रावण महिना, ____ हाच माझा खरा दागिना.
भारतीय नारी नेहमी पतीला देते उच्च स्थान, भारतीय नारी नेहमी पतीला देते उच्च स्थान, _____ रावांचा ठेवीन सदोदित मान.
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे, सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे, ____ रावांना आवडतात गरम गरम बटाटा वडे.
घराच्या पुढे अंगण, अंगणात सजलाय बोगनवेल, घराच्या पुढे अंगण, अंगणात सजलाय बोगनवेल, प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून _____ रावांच्या घराची बेल.
मूर्तिकार घडवतात सुंदर मूर्ती, मूर्तिकार घडवतात सुंदर मूर्ती, ____ रावांची वाढो सर्वदूर कीर्ती.
गृहप्रवेश करताना साठविले मायेचे मोती भर-भर, गृहप्रवेश करताना साठविले मायेचे मोती भर-भर, ___रावांच्या हातात हात घेऊन झाले मी आत्मनिर्भर.
Recent Posts
अश्याच नवनवीन/Latest मराठी उखाण्यासाठी आमच्या website Visualमराठी ला वेळोवेळी नक्की भेट द्या. आम्ही नेहमी तुमच्या साठी मराठी भाषेतील Unique Content पुरविण्याचा प्रयत्न करू.
Table of Contents
Toggle